आत्रेय याज्ञिक कार्यशाळा निर्मिती
जे जे आपणासि ठावे।ते ते सर्वासि सांगावे।ज्ञानी करुनी सोडावे सकळ जन॥
यासंतउक्तिच्या अर्ध्याचभागाचा [पहिल्याअर्धरीचा] विचार प्रत्यक्षात आणण्याचा अल्पसाप्रयत्न म्हणून तसेच समाजाध्ये आपल्या संस्कृतीच्या अनेक महत्वाच्या गोष्टिपैकी यज्ञयागा संबधीत असणा-या [सध्याकालबाह्यठरतअसलेल्या ] विषयांची पुनरावृत्ती होऊन आपली संस्कृती किती महान, सूक्ष्मविचारांची आहे हे पुन्हास्मरावे. यासाठीआमचे सर्वसहकार्यानी मिळून २००७ सालि याचाविचारकरून “श्रीदत्तमंदीर “शांतिनगर टिळकवाडी येथे प्रथम मंडपकुंडाचा प्रयोग केला त्यानंतर हाच विषय कायमस्वरूपी असावा असा विचारकरून यासर्वांची माहीती समाजास व्हावी याहेतुने ” मंडोळी” ग्रामात या यज्ञशाळेची निर्मिती झाली आज कालच्या अधुनिक
[धवपळीच्या] जीवनामध्ये प्रत्येकास काही कर्मकरण्याची इच्छा असूनही जागेच्याअभावी किंवा अन्यकारणामूळे धार्मिक कर्मानुष्ठान करणे कठिण जात असताना दिसते. कोठेतरी [तीर्थक्षेत्रावर ] करणे आर्थिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी शक्य होत नाही , अशांचीसोय व्हवी ती सुध्दा योग्य रितीने व्हावी, आपल्या जवळ व्हावी या एकमेव उद्देशाने सामाजिक ऋणाचे भान ठेऊन आमच्या सर्व सहकार्यांच्या प्रेमळ ,शारिरीक आर्थिक सहकार्याने याची निर्मीती झाली .
या ठिकाणी सर्व प्रकारच्या शांतिकर्म ,पौष्टिक {देवतायागादि ] जसे गणहोम चंडीयाग , सामाजिक हितासाठी धन्वतरीयाग ,माहामारी निवारणासाठी करण्यात आलेले पंचायतनयाग , मृत्युंजय जपानुष्ठानग्रह संबंधी ग्रहशांती इत्यादी अनेक कर्म केले जातात तसेच श्राध्दपक्ष हेही याठिकाणी होतात. तसेच ग्रहनक्षत्र यांच्यासंबधी असणा-या वनस्पतींची [ग्रहनक्षत्र] लागवड सुध्दा याठिकाणी पाहण्यास मिळते. आपल्या बेळगावातील एकमेव असे एकच ठिकाण आहे ज्या ठिकाणी यज्ञमंडप कुंड व नक्षत्र वृक्षांची माहीती व प्रत्यक्ष पाहण्य़ास मिळतात.