अग्नि संस्कार
अग्निमूर्ति महत्व
आपल्या वैदिक हिंदू संस्कृतिमध्ये अग्निस अतिशय महत्व आहे. कोणतेही महत्वाचे संस्कार हे अग्निशिवाय होणे शक्यच नाही . हि एक आजन्म उपासनाच आहे. जन्मापासुन मरणांत त्याही नंतर अग्निची आवश्यकता असतेच पंच महाभूतापैकी एक महत्वाचा भूत म्हणजे अग्नि, ज्याची निर्मिती सूर्यापासुन असून जगताचे चलन-वलण हे या वरच अबलंबून आहे. ऊर्ध्व गतीस घेवुन जाणारा एकमेव म्हणजे अग्निहोय . प. पू श्री टेंबेस्वामी [ वासुदेवानंद सरस्वती] यानी आपल्या दत्तमहात्म्या मध्ये [दत्तपुराण] अग्निचे महत्वसांगितलेले आहे . सुरुवातच अग्निचीच स्तुती आहे. ऋग्वेदाची सुरुवात सुध्दा अग्निच्या स्तुतिनेच आहे. पुढे जाऊन कर्मफल ओढुन आणतो तो अग्नि ऋग्वेदामध्ये सुध्दा अग्निस पुरोहित असेच म्हंटले आहे. जो कर्माचेफल देतो, कल्याण करतो तो अग्नि . प्रत्येक कार्याच्या वेळी याचे नाव व कार्य हे वेगळे-वेगळे आहे. जीवनाचे चक्र चालण्यासाठी जी ऊर्जा लागते तीच या अग्निचेच स्वरूप आहे. जोवर आपल्या शरीरात अग्निचे अधिष्ठान असते तोवरच आपणास जीवंतपणा [आपले आस्तित्व] असतो. एकदा तो अग्नि शरीर सोडून जातो तेव्हा तेच शरीर[ती व्यक्ति] प्रेत होते. इतके महत्व आपल्या संस्कृतिने अग्निस दिले आहे [त्यांची सर्व गुणांची पारख करुन ] आज आपण अग्निचे स्वरूप प्रत्येक ठिकाणी त्याचे कार्य काय ते पाहु
अनेक मंत्रानी [सूक्ताने ] अग्निची स्तुती केली आहे असे आपल्या वेदामध्ये पहावायास मिळते. सर्वसामान्य पणे पुढील प्रमाणे केली आहे असे दिसते.
” सप्तहस्त श्र्चतु: शृंग: सप्तजिव्हो व्दिशीर्षक: । त्रिपाद प्रसन्नवदन: सुखासीन: शुचिस्मित: ।। स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देवीं वामे स्वधांस्तथा ॥ बिभ्रत्दक्षिण हस्तैस्तु शक्तिमन्नं स्रुचंस्रुवं । तोमरं व्यजनं वमैर्घृतपात्रंच धारयन ॥ मेषारूढो जटाबध्दो गौरवर्णौ महौजस: । धूम्रध्वजो लोहिताक्ष: सप्तार्चि: सर्वकामद: । आत्माभि मुखमासीन: एवंरूपो हुताशन: ॥
वरील श्र्लोकात अग्निच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे.
सात हात चारशिंगे सात जिभा दोन डोकी [शिर्षक] तीन पाय प्रसन्न असे मुख सुखाने आसनस्थ झालेला स्मित हास्य असे शारीरिक स्वरूप आहे. उजवीकडे स्वाहा डावीकडे स्वधा या शक्ति शक्ति अन्न स्रुवा दर्वी ही आयुधे उजव्या हातात, तोमर ,पंखा घृतपात्र हि डाव्या हातात. अशी आयुधे धारण करून मेषावर बसलेला [मॆंढयावर]आरूढ झालेला , जटा बांधलेला गौरवर्णाचा धूर्मवर्णाचा ध्वज असलेला हा असा अग्नि माझ्या कार्या करता माझ्या संमुख व्हावा. वरील श्र्लोकामध्ये ज्या सात जिव्हा सांगितलेल्या आहेत त्या पुढिल प्रमाणे
हिरण्य गगना रक्ता कृष्णा सुप्रभा बहुरूपा अतिरक्ता च एवं सप्तजिव्हा सात्विका ।
पद्मरागा सुवर्णा भद्रा लोहिता श्वेता धूमिनी करालेका राजसा ।
सुर पितृ गंधर्व यक्ष नाग पिशाच राक्षसा: च क्रमाद अग्नेरसनासु आश्रिता: ॥
सात्विक जिव्हा देवतांच्या कार्या साठी राजस काम्यकर्मा साठी तर तामसि क्रूरकर्मा साठी . व
अग्निमूर्ति
जातवेदस, सप्तजिव्हा,हव्यवाहन,अश्वोदर,वैश्वानर,कौमारतेजस, विश्वमुख, देवमुख इत्य अग्निमूर्त्या: ।
हे अग्निचे बाह्य रूप असून अंतर:रूप हे वेद म्हणजे चार शिंगे हव्य-कव्य कर्मासाठी दोन शिर्ष ,स्वहा स्वधा शक्ति , भु भुव: स्व: तीन लोक क्रमण करण्या साठी तीन पाय असे विराट रूप आहे. त्याच प्रमाणे कर्माप्रमाणे त्याचे कार्य हे वेगळे आहे जसे
लौकिक कर्मा साठी पावक ,मारुत गर्भाधानासाठी, पुंसवनासाठी शोभन, सीमंतोन्नयनासाठी मंगल , जातकर्मासाठी प्रबल , नामकरणासाठी पार्थिव अन्नप्राशनास शुचि चौलासाठी सभ्य उपनयनासाठी समुद्भव गोदानादि समावर्तनास सूर्य विवाहात योजक अग्निहोत्रात व्दिज वैश्वदेवात रुक्मक प्रायश्र्चित्तासाठी विट स्वयंपाकासाठी पावक देवता कर्मास हव्यवाहन पितृकर्मास कव्यवाहन शांति कर्मासाठी वरद पौष्टिक कर्मास बलवर्धन पूर्णाहुतिस मृड अभिचारिक कर्मास क्रोध वशीकरणात कामद अरण्य जाळण्यास दूषक पोटातील जठर श्मसानातील [प्रेतदहन] वेळेस क्रव्याद लक्ष होमात वन्हि कोटि होमात हुताशन वृषोत्सर्गात अध्वर सुचयांत ब्राह्मण समुद्रात वाडव प्रलयकाळी संवर्तक गार्हपत्य हा ब्रह्मा दक्षिण हा ईश्वर आहवनीय हाविष्णु असे तीन अग्नि अग्निहोत्रात असतात. त्या त्या कर्मावेळी त्या–त्या ठरावीक अग्निची योजना करावी.
पूर्वी सांगितल्या प्रमाणे हे एकमेव तत्व असे आहे कि जे ऊर्ध्व गतीस जाते. पृथ्वी स्थिर, जल हे अधोगतिकडे आकर्षित होते, वायु इतस्त [सर्वकडे] आकाश ही पोकळी मात्र अग्नि हे तत्व फक्त ऊर्ध्व गतीसच जाते. अशा अग्निची सेवा आपण वयाच्या साधारण आठव्या वर्षापासुन [उपनयन संस्कारापासुन] सुरु होते. व शेवटी आपला देहाच्या पूर्णाहुतीने समाप्ती होते. “आरोग्यं भास्करादिच्छेत धनंमिच्छेत हुताशन । ज्ञानंमहेश्र्वरादेच्छेत मोक्षमिच्छेत जनार्दनात ॥ या नुसार धन देणारा अग्निच होय. तसेच अग्निकडे स्वस्ति,श्रध्दा,मेधा,यश,प्रज्ञा विद्या धनं बुध्दि आयुष्य,आरोग्य इत्यांदींची प्रार्थना स्वरुप मागणी केली जाते.
अग्नि संस्कार
देशकाल संकीर्त्य **** कर्मांगं श्रीपरमेश्र्वर प्रीत्यर्थं अग्ने: गर्भाधानदि षोडशसंस्कार सिध्द्यर्थं प्रतिसंस्कारं अष्टवारं वा व्दादशसंख्यया आज्येन व्याहृति होमं करिष्ये । इति संकल्प्य
अग्ने: समंतात परिसमूहनं परियुक्षणे कृत्वा अग्ने उत्तरत: दर्भेषु प्रोषणीं स्रुवं आज्यस्थाली समिधं संमार्ग- दर्भश्र्चासाद्य शुध्दोदकेन प्रोक्षणी: पूरयित्वा अप उत्पूय आज्यपात्रे आज्यं प्रक्षिप्य अवज्वलनोत्पवने च कृत्वा स्रुवं समृज्यानि गंधपुष्पाक्षतै: संपूज्य तूष्णीं समिधं हुत्वा संस्कारहोमं कुर्यात ।
समस्तव्याहृतिनां परमेष्ठी प्रजापति: प्रजापतिर्बृहति अग्ने: गर्भाधानादि संस्कारसिध्दर्थं आज्यहोमे विनियोग: ।
अग्ने: गर्भाधानं संस्कारं करिष्ये :- ॐ मरुत नामाग्निं प्रतिष्ठापयामि ॐ भूर्भुवस्व: स्वाहा [ प्रजापतय इदंनमम ] इति मंत्रेण आज्यंहुत्वा अग्ने: गर्भाधान संस्कारं संपादयामि
अग्ने: पुसंवनं संस्कारं करिष्ये पवमानं अग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: पुसंवनं संस्कारं संपादयामि ।
अग्ने: सीमंतोन्न्यन संस्कारं करिष्ये मंगल नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: सीमंतोन्न्यन संस्कारंसंपादयामि ।
अग्ने: जातकर्मसंस्कारं करिष्ये प्रबल नामाग्निं प्रतिष्ठापयमि । अग्ने: जातकर्म संस्कारं संपादयामि ॥
अग्ने: नामकरणसंस्कारं करिष्ये पार्थिव नामाग्निं प्रतिष्ठापयामे । अग्ने: नामकरण संस्कारं संपादयामि ।
[नालप्रक्षप्यर्थं पंचसमिधा हुत्वा ] {कृताकृत}
अग्ने: निष्क्रमणं स्ंस्कारं करिष्ये लौकिक नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: निष्क्रमण संस्कारं संपादयामि ।
अग्ने: अन्नप्राशन संस्कारं करिष्ये शुचि नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: अन्नप्राशन संस्कारं संपादयामि ।
अग्ने: चौल संस्कारं करिष्ये सभ्य नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: चौल संस्कारं संपादयामि ।
अग्ने: उपनयन संस्कारं करिष्ये समुद्भव नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: उपनयन संस्कारं संपादयामि ।
प्राजापत्य, सौम्यक, आग्नेयं संस्कारं सिध्द्यर्थं सूर्य नामाग्निं प्रतिष्ठापयामि त्रिगुण आज्यहोमं कृत्वा वा पृथक । अग्ने: प्राजपत्य संस्कारं संपादयामि अग्ने: सौम्यक संस्कारं संपादयामि , अग्ने: आग्नेयं संस्कारंसपादयामि । इति उत्वा
अग्ने: वैश्र्वदेवं संस्कारं करिष्ये रुक्मक नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: वैश्र्वदेवं संस्कारं संपादयामि
अग्ने: समावर्तन संस्कारं करिष्ये सूर्य नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: समावर्तन संस्कारं संपादयामि ।
अग्ने: उव्दाहं संस्कारं करिष्ये योजक नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: उव्दाहं संस्कारं संपादयामि ।
अग्ने: अग्न्याधानं संस्कारं करिष्ये लौकिक नामाग्निं प्रतिष्ठापयामि । अग्ने: अग्न्याधानं संस्कारं संपादयामि ।
अनेन अग्नि संस्कार आज्यहोमाख्यं कर्माणाऽग्निनारायण स्वरूपी श्रीपरमेश्र्वर: प्रीयतां ।
मूर्धानं ०इति पूर्णाहूतिं हुत्वा ।
अग्निं परिसमूहनं परियुक्षणे कृत्वा। गंधाक्षतै: संपूज्य । चत्वारि ० इत्यादि ध्यानादिकृत्वा ॥