अर्धचंद्राकृती कुंड

चोवीस अंगुलांचा चौरस बनवून त्याच्या पूर्व दिशेकडून अडीच अंगुळे सोडून दक्षिणोत्तर एक लांब रेषा काढावी. त्याच रेषाच्या मध्यावर एकोणवीस १९ अंगुळे १ यव १ युका ५ लिक्षा व ७ बालाग्र प्रकल्पाने माप घेऊन एकोणवीस अंगुले मोजुन तिरपी रेषा काढावी {अर्धचंद्राकार} रेषा काढावी म्हणजे अर्धचंद्राकार कुंड बनते.
हे कुंड मंडपाच्या दक्षिण दिशेस असते. मानसिक उव्देग कमी करुन मानसिक स्थैरता {स्थिरता} प्राप्त होण्यासाठी या कुंडाचा उपयोग होतो. हेहि दक्षिणोत्तरच असते. ग्रहांच्या बाबतीत हे कुंड मंगळ या ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. या कुंडाची योनी दक्षिणेस असते.