भुवनेश्र्वरी
हा संस्कार पहीला असला तरी त्याबरोबरीचाच किंवा त्याहून महत्वाचा हा विधी म्हणण्यास काहीही हरकत नाही असे माझे मत आहे. कारण हा विधी म्ह्णजे एक प्रकारे गर्भाशयाची शुध्दिच होय .म्ह्णुनच अनुक्रम सुध्दा भुवनेश्र्वरी नंतर गर्भाधान असाच आहे. यास दुष्टरजोदर्शन शांति असेही नाव आहे. हा विधी प्रथमवेळी प्राप्त झालेल्या रजोदर्शनावेळी असलेल्या अनिष्ट नक्षत्रादीं विषयी आहे. “शुध्दबिजापोटी फळे रसाळ गोमटी” या संतवाक्याचा प्रत्याय येण्यासाठी [घेण्यासाठी] ही शांती महत्वाची आहे. आपल्याला जर फळे उत्तम प्रतिची हवी असल्यास मुख्यत: बीजा शुध्द किंवा उत्तम प्रतिचे हवे त्याच प्रमाणे क्षेत्राची शुध्दता त्याची प्रत [क्वालिटी] उत्तमच हवी.पडीक किंवा माळरान जमीवरचे पीक व सुपीकजमीनिवरचे पीक यांच्या मध्ये जसे मूलभूत तत्वामध्ये फरक जाणवतो किंवा एकाच पीकामध्ये सुध्दा गावागावामध्ये फरक जाणवतो यांचे कारण जसे हवामान तसेच त्या जमीनीवर होत असलेले संस्कारच होय. हाच विषय आपल्या संततीच्या बाबतीत लागु पडतो , रज-शुक्र जेवढ्ये पुष्टकिंवा शुध्द तेवढी संतती ही सुढृड [मानसिक] प्रजा या संज्ञेस योग्य ठरते.नुसती लोकसंख्या म्हणजे प्रजा होत नाही ,आपल्या शास्त्राला ही मान्यनाही, तर “प्रकर्षेण गुण अभिवृध्दये” इति प्रजा हि व्याख्या आहे. या ठीकाणी गुणांची[सद्गुणांची] अभिवृध्दि अपेक्षित आहे. म्ह्णुनच बीज व क्षेत्रसुध्दा तेवढेच शुध्द हवे. याच साठी भुवनेश्र्वरी शांत सांगितली आहे. प्रथम रजोदर्शनावेळी आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे विपरित परिणामकारक [दोष] असणारे असे तिथी, वार,नक्षत्र योग, करण, वेळ वस्त्र इ. अनेक गोष्टींचा विचार केला आहे. त्या मध्ये कोणते शुभ कोणते अशुभ व त्यांची फल यांचे विस्तृत विवेचन आहे. पूर्वी पितुगृही रजोदर्शन मान्य नव्हते मात्र कालमानाप्रमाणे आज ते शक्य नसल्यामुळे व आपण या विषयाची गंभीर दखल घेत नसल्यामुळे प्रथमरजोदर्शना वेळी असलेल्या घटकांचा विचार जास्त करत नाही. नंतर त्याच्या विपरित परिणामाला सामोरेजावे लगते. आजच्या पुरोगामी विचारांच्या पगड्या मुळे रजोदर्शन म्हणजे एक शारिरीक उत्सर्जन क्रिया एवढ्या पुरतेच मर्यादित दिसते.पाश्चात प्रोफेस्र शीक यांची १९६०-७० च्या दरम्यानच्या दशकात यावर संशोधन करुन बरेच निष्कर्ष काढले जे आपल्या संस्कृतितील विचारांशी मिळतात. ऋतुकाल हा गर्भधारणेसाठी असणारा महत्वाचा भागा आहे . त्या शिवाय गर्भधारणाहोणे अशक्यच किंवा त्यात काही बिघाड झाल्यास होणारी संतती ही निरोगी होणारच नाही ऋतुकालाचे अशैच पाळणे हे आज कालबाह्यझालेले दिसते मात्र याच विपरित परिणाम हा कालांतराने स्त्रीच्या शारीरिक मानसिक पातळीवर होताना दिसतो.
प्रथमरजोदर्शन हे पितु:गृही झाले असले तरी हा विधी करण्याचा अधिकार फक्त पतिलाच असतो हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहीजे प्राप्त परिस्थितीचा विचार करता विवाहोत्तर प्रथम ऋतु [रजोदर्शन] प्राप्त झाल्यानंतर शुभनक्षत्रादींचा अग्निवास इ. विचार करुन “सुस्नातया पत्न्यायुत” असा विचार शास्त्रकारांनी सांगितलेला असल्यामुळे रजोदर्शना पासुन पाचव्या दिवशी किंवा वर उल्लेख केल्या प्रमाणे शुध्द दिवशी चंद्रतरादि अनुकूलता पाहुन करावा. “ममपत्न्या: प्रथमरजोदर्शने अमुक [जे मासादि दुष्टसूचीत सांगितलेले आहेत त्यांचा उच्चार करावा] मासादि सूचितसकलारिष्ट निरसन व्दारा श्री परमेश्र्वरप्रीत्यर्थं सग्रहमखांशौनकोक्तां शांतिं करिष्ये” असा संकल्प करावा. व शांतस्वभावाचा,कुटुंबानेयुक्त जितेंद्रिय मंत्रादिंचा जाणता अशा आचार्यांची योजना करावी.त्यांच्या सहकार्यासाठी ४,६,८, ब्राह्मणांची योजना करावी. आचार्याने शुध्दस्थली तीनकलश स्थापन करावे. त्यामध्ये जल, गंध, सर्वोषधी, यव,तांदुळ,उडिद,कंगु[राळे] श्यामक , मूग, ओदुंबर,दर्भ,दूर्वा,लालकमळ,चाफा, बिल्व, विष्णुक्रांत, तुळशी, बर्हि:, शंखपुष्पी, शतावरी, अश्र्वगंधा, निर्गुंडि ,लाल,पिवळीमोहरी, आघाडा, पळस, फणस,जीवक[प्लक्ष] {पायरी} ,प्रियंगु,गहु, व्रीहि, पिंपळ, दही,दूध,तूप, कमळाचेपान, नीळेकमळ , पांढरी तांबडी पिवळी कोरंटी, गुंजा, वेखंड, भद्रमुस्तक [नागरमोथा] इत्यादी औषधी घालाव्यात. पिंपळ,उंबर, पायरी, आंबा, वडाची पाने घालावीत, हत्ती घोडा,वारुळ, संगम ,डोह, गोठा, चौकातील माती घालावी. वज्र,नील,पद्म,मोती इत्यादी रत्ने घालुन कलशास सूत्रवेष्टन करावे. त्यावर पूर्णपात्र ठेवुन मुख्यदेवता “भुवनेश्र्वरी व इंद्राणी इंद्र या आधिप्रत्याधि देवतांचे आवाहन पूजन करावे. व भुवनेश्र्वरीसाठी दूर्वा तिलमिश्रगहु पायस आज्य इत्यादिंनी होम करावा. त्या नंतर उर्वरीत कर्म करावे.
हा विधी शांति या सदराखाली येत असल्यामुळे याचा अग्नि वरद नावाचा आहे. भुवनेश्र्वरी ही मुख्यदेवता आहे. भुवनाची आधिष्ठात्री म्हणजेच भुवनेश्र्वरीहोय . भुवन म्ह्णजे क्षेत्र ज्या ठीकाणी आपल्यापूर्वजांनी ज्यागुणांची अभिवृध्दि करत आपल्या पर्यंत आणुन ठेवले तेच आपण वृध्दि करत पुढे संक्रमण केले पाहीजे. ही जबाबदारी आपली आहे. याची जाणीव ठेऊन सामाजिक उत्कर्ष करुन सुप्रजा निर्माण करुन देश,संस्कृति, धर्माची एक प्रकारची सेवाच होय.
गर्भाधान
गर्भाधान हा पहीला संस्कार जो आजच्या जीवनात एक चेष्टेचा विषय किंवा एक भोगाचा विषय म्हणुन बघितला जातो जो साफ चुकीचा आहे. भोगाचा विषया आपल्या संस्कृतिने कधीच ग्राह्य केलानाही. भोग हा त्यातला छोटासा भाग तोही विधिच या मागील आपल्या ऋषी-मुनींचे उद्दात्त विचारांचा अभ्यासकेल्यास खरोखरच त्यांच्या ज्ञानाचे सामर्थ्यांची कल्पाना येते. समाज कसा हवा? त्याबद्दलचे विचार जे धर्माच्या चौकडीत बसवुन सामाजिक कल्याण्यच साधले आहे. हा संस्कार म्हणजे भावी पिढींचा पायाच होय. तो जर भक्कम [संस्कृत] असेल तरच पुढिल पिढी ही सुसंस्कृत होतो. जसे पाया भक्कम असेलतरच इमारत भक्कम असते. नाहीतर ती तगलुपी ठरते. तसेच आपल्या समाजाचे आहे. प्रजा ही नुसती लोकसंख्या नसुन एक प्रकारचे सास्कृतिक जीवनच आहे. यामधील प्रजा नावाचा घटक जर विकृत निघाला तर त्या ठीकाणी सांस्कृतिक -हास नक्किच होतो जो आपल्या संस्कृतिला देशाला समाजाला घातकच असतो. या संस्कारामुळे गर्भधारणा होताना उद्भवणा-या आधिभैतिक,आधिदैविक आध्यात्मिक इ. विघ्नांचा नाशहोऊन सर्वबीज गर्भस्थापन व्हावा हा उद्देश आहे. चरक शास्त्रानुसार “शुक्रशोणित जीव संयोगे तु खलु । कुक्षिगते गर्भसंज्ञाभवति ॥ केवळ स्त्री बीज व पुरुषबीज यांचे एकत्रीकरण होणे म्ह्णजे गर्भधारणा हे आयुर्वेदाला मान्य नाही. ज्या वेळी स्त्री-पुरुष यांचे बीज व जीव म्हणजेच आत्मा यांचा संयोग होतो तेव्हाच गर्भधारणा हीच आयुर्वेदोक्त आहे. ज्या प्रमाणे फक्त बीजच चांगले असुन उपयोगहोतनाही. तसेच त्याला वातावरण योग्यऋतु [सिझन] जमिनीचा सकसपणा खत-पाणी योग्यवेळी त्याची देखरेक [मशागतादि कार्ये] ऊन पाऊस यांचे प्रमाण यावरच पीक अबलंबून असते हे सर्वश्रुतच आहे.त्याच प्रमाणे गर्भाधानाच्या बाबतीत सुध्दा शुक्र,रज, स्त्रीप्रजननसंस्था, पुष्टरस धातु .इत्यादिंची शुध्दि,पुष्टी हवीच .हे सगळे भाव अविकृत असल्यासच सुप्रजा निर्माण होते.हे जाणुनच आपल्या पूर्वजानी यम -नियमादींचे योजना केली आहे. ही आपल्या संस्कृतिमध्ये वयाच्या आठव्या वर्ष्यापासुन सुरवातकेली आहे. समाज बलवान होण्यासाठी त्याचा सगळ्यात सूक्ष्मअसणारा घटक जो प्रजा ही बलवान हवी,[बलवान म्हणजे शारिरीकपातळीवर तर आहेच त्याच बरोबर मानसिक स्तरावर जास्त केंद्रित आहे. ] मनोबल उत्तम असल्यासच शारिरीक साथमिळते. नुसती शारिरीक बळ असुन मनोबल कमी असल्यास त्याचा पराभव नक्किच या मनोबलावरच आपण जे हवे ते मिळवु शकतो ही एक अंतरीत शक्ति आहे.
आज या इतक्या महत्वाचा संस्कार व त्यामागील मूल उद्देशच आपण विसरलो आहे. विवाहा दिवशीच हा विधी उरकुन घेण्याचा अट्टाहास करताना दिसतात. मात्र त्यातील तांत्रिक गोष्टिचां विचारसुध्दा करत नाही जसे विवाहाचे देवक ऊठवलेले नसते, विवाहाचा अग्नि व गर्भाधानाचा अग्नि हा वेगळा एकाच अग्निवर हे दोन वेगळे -वेगळे संस्कार करता येत नाही. या संस्काराचे तिथ्यादि मुहूर्त व विवाहासाठी असणारे तिथ्यादि मुहूर्त हे वेगळे असतात. या संस्कारास लागणारा महत्वाचा काल म्हणजे स्त्रीचा ऋतुकाल होय.
या संस्कारास असणारा तिथ्यादिचा विचार करु, चतुर्थी ,षठी, अष्टमी , चतुर्दशी ,आमावास्या, पौर्णिमा, एकादशी,श्राध्दाचा त्याच्या पूर्वीचा व नंतरचा दिवस जन्मदिवस व्रतानुष्ठानाचा काल ग्रहण, करीदिन, पर्वकाल, संक्रांतिंचे दिवस इत्यादि वर्जावी. ऋतुकालातील ४,६,८,हे दिवस वर्जावे.
सोमवार,गुरुवार,शुक्रवार, हे वार रोहिणी,आर्द्रा, पुष्य,तीन्हीउत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा शततारका, ही नक्षत्रे उक्त होत. १४ वा दिवस हा प्रशस्त मानला आहे. चंद्रादिग्रहानुकूलतेचा विचार तर प्रत्येक संस्कारास हवाच. चंद्र हा मनाचा कारक असून त्याच्या अनुकूलतेचा किंवा प्रतिकुलतेचा परिणाम आपल्या जीवनावर नित्य होत असतो तसेच सत्वादि गुणांचा देखिल परिणाम होतोच. म्ह्णुनच वरील मुहूर्तकिंवा दिवसांचे बंधन योग्य ठरते. आधान नक्षत्रापासुनचे १० नक्षत्र हे जन्म नक्षत्र असते. हा सामान्य नियम आहे, म्ह्णुनच जी नक्षत्रे माता.पितरादिंना अनिष्ट सांगितलेली आहेत तीजवर जनन होऊनये म्हणुन नक्षत्रांचा विचार केला आहे.
संकल्प :- अस्या: मम भार्याया: प्रतिगर्भसंस्कारातिशयव्दारा अस्यां जनिष्यमाण सर्व गर्भाणां बीज गर्भ समुद्भव एनोनिबर्हण व्दारा श्री परमेश्र्वर प्रीत्यर्थं गर्भाधानाख्यं कर्म करिष्ये.”
म्हणजेच बीजगर्भ व पुढ होणारी संतती [प्रतिगर्भ] यासाठी हा संस्कार एकदाच करावा.पुण्याहवाचनादि होमादि कर्म झाल्यानंतर पत्निच्या मागे थांबून आपल्या डाव्या हाताने तीची हनुवट वर करुन उजव्या नाकपुडीत दूर्वा किंवा अश्वगंधा , या वनस्पतिंचा रस पीळावा तो रस तीच्या नाकावाटे उदरामध्ये गेला पाहीजे. हा महत्वाचा भाग या संस्काराचा आहे. दूर्वा ही वनस्पति थंड प्रकृतिची असुन दाह कमी करणारी आहे. ” त्वं दूर्वेऽमृत जन्मासि वंदितासि सुरैरपि । सौभाग्य संततीकरि सर्वकर्म सुशोभना ॥ वरील मंत्रामध्ये या वनस्पतिस संतती कारी असे म्हंटले जाते. ही अमृत वनस्पति आहे. कितीही नाशकेला तरी ती उगवतेच. रस सेचन हे उजव्या नाकपुडीतच पिळावा असे सांगितले आहे त्याचे कारणही अत्यंत महत्वाचे आहे. इडा पिंगला या पैकी सूर्याची प्रतिनिधित्व करणारी ती कार्यरत होते. अश्वगंधा ही गर्भाधानासाठी उपयुक्त आहे. ज्याठीकाणी संयोग होतो त्या ठीकाणी उष्णता निर्माण होतेच त्याचा दाह नियंत्रित करण्याचे कार्य दूर्वा करते. आयुर्वेदामध्ये सुध्दा नस्य ही एक उपचार पध्दती आहे. नस्यामुळे प्रभाव जास्तप्रमाणात होतो.
या संस्काराची देवता ही ब्रह्मा आहे ब्रह्म यालाच प्रजापति असे दुसरे नाव आहे त्रिदेवापैकी निर्मितीचे कार्य करण्याचे काम हे ब्रह्म्याचे आहे, विष्णु पालनकर्ता व महेश निर्मितीसाठी संहार या पैकी या संस्कारात निर्मीतीची अवश्यकता असल्यामुळे ज्याचे कार्य निर्माण करणे आहे तो याचा देवता होऊशकतो अन्यनाही. हा सामान्य नियम आहे. म्हणुनच या ठिकाणी या ब्रह्म्याची योजना केली आहे. प्रजेचा पति तो प्रजापति हा ही ब्रह्माच होय. भारतीय संस्कृतिने सुप्रजननास अतिशय महत्व दिलेआहे. किंबहूना सुप्रजननच अपेक्षित आहे. जी प्रजा बुध्दि,शक्ति,विवेकादि गुणसंपन्न आहे. ती सुप्रजा ज्या राष्ट्राची प्रजा सुप्रजा असेल ते राष्ट्रनेहमीच यशाच्या उत्तुंग शिखरावर असते. सुप्रजनन कसेव्हावे हे आपल्याच संस्कृतिने अखिल जगास सांगितले आहे. दुर्दैवाने आपण ही गोष्ट आज विसरत चाललो आहे. याचा परिणाम आपण अप्रत्यक्षरित्या आज भोगत आहोतच मात्र येणा-या काळात हा प्रत्यक्ष भोगावा लागेल. आजच्या मुलांचा विचार केल्यास मनोबलाची कमतरता, विभागणी करण्याची मानसिकता [दात्वृत्व वृत्तिचा अभाव] शारिरीक क्षमता, अपयशपचविण्याची ताकत ह्या गोष्टींची कमतरता दिसून येते. याचे मुख्य एक कारण म्हणजे संस्कार हीनता होय. जीव निर्माणहोण्याकरता आपल्या पूर्वजानी सातपिढ्यांचा विचार केला आहे . कोणताही गुण -दोष हा सात पिढ्यांचा असुशकतो असे आपले ज्योतिष शास्त्र सांगते. याचे महत्वाचे कारण म्हणजे जीवाच्या निर्मितीत सहायक असणारे गुण सूत्रे जी आपल्या शरीरात असून पुढील पिढीत गुण-दोषासह संक्रमित होतात. शुक्राचे तंतु हे ८४ संखेने असतात त्यात
वडीलांचे २१ अजोबा १५ पणजोबा १० खापरपणजोबा ०६ पाचव्या पिढितील ०३ सहाव्या पिढीतील ०१ इतर मातेकडुन प्राप्त होतात.
या संस्काराचा अग्नि हा मरुत नावाचा आहे. वायुच्या अनेक नावापैकी मरुत असेही एक नाव आहे.पंचमहाभूतापैकी एक हा वायु ज्याच्यामुळे सृष्टीचे चलन वलन सुरु असते. अनेक प्रकारच्या वायुपैकी प्राणवायु हा मुख्य मानला जातो. याचे कार्य मुख्यत: वाहुननेणे किंवा वहन करणे जल सुध्दा वहन करते पण त्या व या दोन्ही वहनामध्ये बराच फरक दिसुन येतो.पु बीजांचे वहन करुन तो व्यवस्थितपणे क्षेत्राच्या ठीकाणी स्थापन करणे हे मुख्य कार्य या वायुखेरिज कॊण करणार बरे? असा हा मरुत नावाचा अग्नि या दोन बीजांचा संयोगास न्याय देतो
भावीपिढिच्या उत्त्म भवितव्याचा विचार असलेला . असा हा पहिला महत्वाचा संस्कार सुप्रजनन होऊन राष्ट्र किंवा विश्र्वाचा उध्दार व्हावा हाच आपल्या ऋषी-मुनींचा स्वर्थ.