चोवीस अंगुळाचा गज किंवा प्रमाण घेऊन चारीबाजूला {पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर} अग्नेय नैऋत्य वायव्य इशान कोपरे परस्पारास जोड्ल्यास चौरस कुंडाची निर्मिती होते. हे कुंड प्रधानकुंड किंवा आचार्य कुंड म्ह्णून ऒळखले जाते सर्वप्रकारची सिध्दि देणारे आहे . हे कुंड ग्रहांच्या बाबतीत सूर्य व शुक्र यांचे प्रतिनिधित्व करते.रवि शुक्र यांच्या दोषपरिहारासाठी किंवा ग्रहानूकुलते साठी या कुंडाचा वापर होतो.नव कुंडामध्ये दोन चौरस कुंड असतात, एक ईशान-पूर्व मध्य किंवा मंडपाच्या मध्यभागी असते. दुसरे पूर्वदिशेस असते. दोन्हीही कुंडाची योनि उत्तराभिमुखच असते .