जातकर्म
आता प्रर्यंत आपण गर्भासंबंधीचा विषय पाहीला आता वेळ आली आहे प्रत्यक्ष त्या जीवावर संस्कार करण्याची आतापर्यंत आपण माते मार्फत संस्कार करत होतो. हा पहीला संस्कार जो प्रत्यक्ष त्या जीवावर [शिशुवर ] केला जातो . तो म्हणजे “जातकर्म ” म्हणजे जातकावर केले जाणारे कर्म होय. वरील सर्व संस्कारानी युक्त असा तो गर्भ [जातक] किंवा शिशु योग्य काली प्रसवतो. मूळादि अनिष्ट योगावर न प्रसवलेला असा जातक झाल्याबरोबर पित्याने कुलदेवतास वडील मंडळीना नमस्कार करुन उत्तराभिमुख होऊन शीतोदकामध्ये [थंड]पाण्यामध्ये सुवर्ण घालुन स्नान करावे. नदी समीप असल्यास उत्तम या वेळी रात्री प्रसूति झाल्यास रात्री सुध्दा नदीवरच स्नान करावे. पुत्राचे मुख पाहील्यामुळे आपली पितृ ऋणातुन मुक्तता होते पौत्राच्या मुखावलोकनामुळे ऋणव्द्यातुन मुक्त होतो व प्रपुत्राच्या मुखावलोकनामूळे ब्रह्म लोकाची प्राप्ति होते. या ठीकाणी पुत्र या शब्दात कन्येचा सुध्दा अतंरभाव होतो असे धर्मसिंधुकार म्हणतात. पहिले आपत्य हे पुत्र या संज्ञेसपात्र ठरते.
हा संस्कार पुत्राच्या नालच्छेदना पूर्वी करावा. जर कदाचीत कालक्रमण झाल्यास नामकरण संस्काराबरोबर करावा. किंवा शुभतिथ्यादिंचा विचार करुन मृग चित्रा रेवती अनुराधा श्रवण स्वाती शततारका धनिष्ठा रोहीणी तिन्ही उत्तरा अश्र्विनी हस्त पुष्य या नक्षत्री करावा. हा संस्कार व यापुढील सर्व संस्कार प्रत्येक वेळी स्वतंत्रच करावे.
” मम अस्य कुमारस्य गर्भांबुपान जनित सकल दोष निबर्हणायु: मेधाभिवृध्दिव्दारा बीजगर्भ समुद्भव एनोनिबर्हण व्दारा श्री परमेश्र्वर प्रीत्यर्थं जात कर्म संस्कारं करिष्ये”
वरील संकल्पाचा विचार केल्यास गर्भामध्ये असताना झालेल्या गर्भांबु पानाचे [ गर्भातील पाणी पिण्याने जे दोष ] परिहार होऊन आयु: मेधा यांची अभिवृध्दि व्हवी म्हणुन हा संस्कार करावा.कोणतेही सदोषता राहुनये म्हणुनच हे संस्कार सांगितलेले आहेत .त्यात गर्भांबुपान हा ही एक दोषच आहे. मेधा ही एक अशी स्थिती आहे जी बुध्दिच्या पलिकडे जाऊन ज्ञान प्राप्त करुन देते. याचा सविस्तर विचार उपनयना मध्ये होईल. तीची जन्मावेळेपासुनच अभिवृध्दिव्हावी व योग्य वेळी ती कार्यरत व्हावी.तीच्या बळावर ज्ञान प्राप्त व्हावे म्हणुन हा संस्कार करावा. बालकाच्या हृदयांत आस्तिक्य बुध्दिचे बीजारोपण व्हावे म्हणुन उजव्या डाव्या कानात [कर्णरंघ्रात] मंत्र पठण करावे. या ठिकाणी नांदिश्राध्द हे द्रव्यव्दाराच करावे. पक्वान्नाने किंवा अमान्नाने करु नये. या वेळी पाचवा,सहावा,दहावा दिवस दान प्रतिग्रहणादि कार्यास जननाशौच मानुनये.
हवनादि विधी [होम प्रकरण ] कृताकृत आहे. पुण्याहवाचनादि कर्म झाल्या नंतर मध व तुप ह्यांचे विषम प्रमाणात घेऊन त्यात सुवर्णाच्या अंशाने युक्त करावे.[ते मिश्रण द्गडावर ठेऊन त्यावर सोने घासावे] ते रूप्याच्या [चांदिच्या] किंवा काश्याच्या पात्रात ठेवुन समंत्र पाजवावे.[चाटवावे] व त्याच्या खांद्यास स्पर्श करावा. त्यांचे रक्षण व्हावे व आयुष्यअभिवृध्दि करिता मस्तक तीन वेळा हुंगावे जे नाव ठेवायचे आहे ते स्मरावे. मातेच्या उजव्या स्तनाचे स्तनपान करवावे.
होम प्रकरणी प्रबल नावाच्या अग्निची स्थापना करावी. प्रबल म्हणजे प्रकर्षेण [विशेष प्रकाराने] बल प्रदान करणारा जो तो प्रबल होय. असा हा अग्नि जीवतात जन्मापासुनच विशिष्ट प्रकारचे बलदेतो. त्या नंतर अग्नि इंद्र, प्रजापति, विश्र्वेदेव ब्रह्मा या देवतांच्या साठी हवन करावे. ज्यायोगाने देवतांची प्रार्थना केल्याने या नवजात बालकास वेदाध्यायनास उपयुक्त अशी बुध्दि,पाशाणा सारखा कठीणपणा [मजबुतपणा] स्थिरत्व उत्तमधन सौभाग्य उत्तम ज्ञान शारिरीकता आरोग्यता मधुरवाणी व चांगले दिवस प्राप्त होतात. असा हा जन्मताच होणारा नवीन शरिराचा पहिला वहीला संस्करा आज लुप्त झालेला दिसतो. या संस्काराचे महत्व लक्षात घेऊन हा संस्कार करुन भावी पिढीतील न्यूनतेची कमतरता भरुन काढावी.