मंडप

यज्ञमंडपाचा परिचयकोणतेही कर्मकरताना आपणास कर्मकरण्यासाठी किंवा बघण्यासाठी तसेच ऊन पाऊस, वारा, यांच्या पासून रक्षण व्हावे. कर्म निवांतपणे किंवा आरामदाई होण्यासाठी मंडपांची निर्मीती {शाळांची} निर्मिती झाली. जी कायमस्वरूपी शाळाझाल्या व तात्पुरते कारणासाठी मंडपाची निर्मीती झाली. जसे गोशाळा, यज्ञशाळा नृत्यशाळा वगैरे , हेच तात्पुरत्या कारणांसठी मंडप तयार झाले . जसे यज्ञमंडप, विवाह मंडप वगैरे . सध्या आपण यज्ञमंडपाचा विचार करु,
धन धान्य ऎश्वर्य लैकीक,-पारलौकीक वस्तुंच्या लाभासाठी यज्ञ करावा. त्याच प्रमाणे श्रौत-स्मार्तकर्मामध्ये यज्ञास अत्यंत महत्व आहेच . अग्निहोत्र वैश्वदेवासारखी नित्य उपासना आहेच यज्ञाची फलप्राप्ती ही भूमीवर सुध्दा अवल्ंबून असत शुभमुहूर्तावर पुरोहीत,यजमान,कारागीरासह भूमीचे संशोधन केले पाहीजे, एक हात खड्डाकरून काढलेली माती चाळून घ्यावी खड्डा पाण्याने भरावा त्यात चाळलेलीमाती ओतावी, पृष्ठभाग काचेप्रमाणे चकचकीत करावा, पाच दिवसाच्या नंतर त्या जागेचे निरिक्षण करावे. तडेगेल्यास अयोग्य समजावी. कारागीरसुध्दा खरेबोलणारा, सद्वर्तनी,विवेकी,कार्यातनिष्णात,मंडपकुंडांची तत्वे जाणणारा, देवधर्मयावरश्रध्दा असलेला असावा. मलीनवस्त्रेधारणकरणारा, रोगी, व्यसनी, अवडंबर करणारा नसावा. भूमीचे विभाग    : 
तीन ते सात हस्तप्रमाणमंडपाचे विभाग होत नाहीत,
आठ ते अठरा  ”       ”    तीन्-तीन विभाग होता 
वीस ते अठ्ठावीस ”       ”    पाच -पाच विभाग होतात.  तीस त पंचाहत्तर ”      ”    सात -सात  ”    ” शंभर हस्तम्ंडपाचे दहा -दहा  विभाग होतात. स्तंभांची संख्यातीन ते सात हस्तप्रमाण मंडपाला ४ स्तंभ असतात. आठ ते अठरा  ”         ”   १६  ”   ” तीस ते पंचाहत्तर ”        ”   चौसष्ट स्तंभ असतात . शंभर हस्तप्रमाण मंडपाला एकशेहे एकवीस स्तंभ असतात. ***नामकरण :-तीन ते सात हस्तप्रमाण मंडपास  ” एकभू” अशी संज्ञा आहे. आठ ते अठरा  “”       ”     “व्दीभू”  ”      ”   ” तीस ते पंचाहत्तर “{”     ”      ” चतुर्भू ” ”   ”   ”  शंभर हस्तप्रमाण      “”       दशभू”     ”    ”   ” यज्ञभूमीचे फल अग्नयकोण उतार व्देष मत्सर, रोग निर्माण करतो.दक्षिणेकडील उतार मृत्युकारक ठरतो .नैऋत्येकडील उतार घरचा नाश करतो पश्चिमेकडील उतार धननाश करतो .वायव्येकडील उतार उव्देगकारक ठरतो.ईशान्ये कडील उतार धनलाभ देतो. पूर्वेस उतार कार्यसिध्दी व उत्तरेस उतार वरदायी ठरतो यज्ञमंडपासाठी स्वत्:ची जमीन उत्तम परकीय जमीनीत मालकाची परवानगी हवी. ती नसल्यास कर्म निष्फळ ठरते. नदी किनारी दोष नाही. जमीनीत भस्म निघाल्यास यजमानांचा नाश ,मुंग्या वगैरे निघाल्यास गावाचा नाश, ओलीमाती वाळूनिघाल्यास    राष्ट्राचा नाश , तुप निघाल्यासपुत्र् व केस निघाल्यास स्त्री नाशहोतो . केश निघाल्यास ब्राह्मणांचा नाश विटादिकांचे तुकडे निघाल्यास बंधुबांधवांचा वियोग होतो गवतादि तृण निघाल्यास कार्यनाश . ओली बारीक वाळू निघाल्यास ज्ञान नष्टहोते. दिशेच्या अज्ञानाने मृत्यु कुलधन नाशहोतो. भूमिचा रंग कोणताही असो जमीन घट्टस्निग्घन माऊमातीचीउपजाऊ असल्यास श्रेष्ठ .दिशाज्ञान
सर्व कार्यास दिक्ज्ञान असणे अतिशय महत्वाचे आहे. १६ अंगुळे प्रमाणाची दोरी घेउन एका ठरावीक बिंदूवर स्थिर ठेउन एक वर्तुळ काढावे. मघ्यभागी १२ अंगुळे एक शंकू रोववावा , पहिल्या प्रहरामध्ये त्याची सावली जेथे पडेल ती पश्चिम दिशा होय . तिस-या प्रहरात सावली जेथे पडेल ती पूर्व  कर्क वृश्चिक वृषभ मकर या राशीत सूर्य असता एक युका अंतर उत्तरेस पुढे धरावे. सिंह कन्या तुळ कुंभ मीन मेष राशीचा रवी असल्यास दोनयुका पुढे द्क्षिणेस धरावी . मिथुन व धनु राशीत रवी असल्यास छाया स्थानीच खुण करावी  पूर्व पश्चिम निम्याने दक्षिणोत्तर व उप दिशांचे ज्ञान होते. कुंडाचे प्रमाण  
यजमानाच्या उंचीचा १/५ { एक पंचमांश } म्हणजे एक हस्त प्रमाण या प्रमाणावरच कुंड-मंडपाची रचना होते. 
एक हस्ताचा २४ वा भाग म्हणजे एक अंगुळ   
याच्याही सूक्ष्म प्रमाण पुढील प्रमाणे 
आठ परमाणु म्हणजे एक त्रसरेणु, 
आठ त्रसरेणु म्हणजे एक रेणु 
आठ रेणु म्हणजे एक बालग्रा 
आठ बालग्रा म्हणजे एक लिक्षा 
आठ लिक्षा म्हणजे एक यूका 
आठ यूका म्हणजे यव 
आठ यव म्हणजे एक अंगुळ  
२४ अंगुळ म्हणजे एक हस्त 
मंडपाची निर्मीती देवता स्थान मंडल 
मंडपाची सर्व तयारी झाल्यानंतर योग्य प्रमाण घेऊन चौरस तयार करावा. 
दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम यांचे प्रमाणाप्रमाणे विभाग करावे. {तीन्-तीन्} विभाग करुन सुताची{धाग्याची} जोड छेद ज्या ठिकाणी प्राप्त होतो त्या ठिकाणी खुणा करुन एक-एक या प्रमाणे बाहेर बारा {१२} आतील मध्यभागी {४} चार असे एकंदर १६ मुख्य स्तंब {खांब} रोवावे. अग्नये वायव्य, नैऋत्य, ईशान्य हे खांब समरेषेत हवेत. यांची उंची पाच हस्तप्रमाणहवी. तो एक हस्त जमिनीमध्ये गाडावा {रोवावा} . चार हस्तप्रमाण जमिनीवर हवा. मध्य चार खांब हे आठहस्तप्रमाण हवे. मध्यवेदीच्या ईशान,अग्नये,नैऋत्य,वायव्य. या उपदिशेस यांची स्थापना होते . बाहेर ईशान्य, ईशान्यपूर्वमध्य , पूर्व , पूर्व अग्नेयमध्य, अग्नेय, अग्नेयदक्षिण मध्य, द्क्षिण दक्षिणनैऋत्यमध्य, नैऋत्य,  नैऋत्यपश्चिममध्य, पश्चिम, पश्चिमवायव्यमध्य वायव्य, वायव्य उत्तर मध्य , उत्तर, उत्तरईशान्यमध्य, असे स्तंब तयार होतील . मध्यवेदीवर कळसाची{शिखराची} निर्मीती करावी. मंडप गवतकाडी इत्यादीकांनी सुंदर अच्छादीत करावा. प्रत्येक दिशेस एक-एक व्दारांची योजना होते. चार व्दारांवर चारप्राकारांचे तोरणांची व्यवस्था होते जसे पूर्वेला वडाचे, दक्षिणेस पिंपळ , पश्चिमेस औदुंबर, उत्तरेस प्लक्ष,{ पायरी} . इत्यादिकांच्या काठ्या व पल्लवानी निर्मीती करावी.
चिन्ह ;_- शिव {रुद्रानुष्ठानात} च्या संबधी चारी व्दारावर त्रिशूल चिन्हांकित असावा. इतर देवतांच्या वेळी पूर्वेस शंख, दक्षिणेस चक्र, पश्चिमेसगदा, उत्तरेसपद्म. या चिन्हानी युक्त असावा. 
ध्वज :-
पूर्वेस इंद्रासाठी पिवळी ध्वज पताका हत्ती चिन्हांकीत 
अग्नयेस अग्निसाठी लाल ध्वज पताका मेष चिन्हांकीत 
दक्षिणेस यमासाठी काळीध्वज पताका महीष चिन्हांकीत 
नैऋत्येस निऋतिसाठी निळि ध्वज पताका नर चिन्हांकीत 
पश्चिमेस वरुणसाठी पांढरी ध्वज पताका पांढ-या रंगाची मासळी चिन्हांकीत 
वायवेस वायुसाठी धुरकट रंगाची ध्वज पताका काळ्यारंगाचे हरीण चिन्हांकीत 
उत्तरेस सोमासाठी हिरव्या रंगाची ध्वज पताका सुवर्णारंगाचा अश्व {घोडा} चिन्हांकीत 
ईशान्येस ईश्वरासाठी पांढ-या रंगाची ध्वज पताका वृषभ चिन्हांकित 
ईशान्य पूर्व मध्य ब्रह्मा साठी पांढरी ध्वज हंस चिन्हांकीत 
नैऋत्य पश्चिम मध्य अनंतासाठी पाढ-या रंगाची गरुड चिन्हांकीत असे ध्वज पताकानी मंडप सुशोभित करावा. 
ध्वजाचे प्रमाण :- दोन हस्त प्रमाण रुंद व पाच हस्त प्रमाण लांब असे ध्वज  व एक हस्तप्रमाण रुंद व सात हस्तप्रमाण लांब हे ध्वज पताकांचे प्रमाण सांगितले आहे. 
आयुधे :-  ही पताकावर चिन्हांकीत करावी . जसे पूर्वेस वज्र, अग्नयेस शक्ति, दक्षिणेस दंड, नैऋत्येस खड्ग पश्चिमेस पाश ,वायव्येस अंकुश, उत्तरेस गदा, ईशान्येस त्रिशूल, ईशान्यपूर्वमध्ये कमंडलू व नैऋत्य पश्चिम मध्ये चक्र अशी आयुधे असावीत.
स्तंबाचे रंग :- 
मध्य मुख्यचार स्तंब :- ईशान्ये पासुन ईशान्येस लाल अग्नयेस  पांढरा नैऋत्येस काळा वायव्य्रेस पिवळा
      
बाहेरील १२ स्तंब :- ईशानकोनातील स्तंबास लाल ईशान पूर्व मध्य पांढरे पूर्व व अग्नेय कोनाच्या मध्य काळा 
आग्नयेस पांढरा  अग्नये दक्षिण मध्य पांढरा दक्षिण नैऋत्यमध्य धुरकट नैऋत्येस पांढरा नैऋत्य पश्चिममध्य पांढरा पश्चिम वायव्य मध्य पांढरा वायव्येस पिवळा उत्तर वायव्यमध्य पिवळे उत्तर ईशान्य मध्य लाल 
इत्यादी रंगाने किंवा वस्त्राने स्तंब शोभित करावे. 
वेदी-देवता 
मंडपाच्या मध्यभागामध्ये मुख्यवेदी सर्वसामान्यपणे असते. ईशान्य दिशेस ग्रहवेदी अग्नयेस योगीनी नैऋत्येस वास्तु वायव्येस क्षेत्रपाल.\भैरव मंडल किंवा पीठ असते.
रुद्रयागात {शिव रुद्र प्रमुख } कर्मात प्रधान वेदी ईशान्येस प्रधानवेदीच्या दक्षिणेस ग्रह वेदी असते. 
प्रधान वेदी १ हस्त उंच व दोन हस्त रुंद असते . 
ग्रहादी सर्ववेदी १ हस्त उंच व १ हस्त रुंद असते . 
प्रधान वेदीस दोन पाय-या असतात ग्रहादी सर्ववेदीस तीन-तीन पाय-या { मेखला } असतात. 
ग्रहांदी वेदींच्या मेखलेस वर पांढरा ,मध्य लाल व खालील मेखलेस काळारंग असतो. प्रधान वेदीस वरची मेखला पांढ-या रंगाची व खालील मेखला लालरंगाची असते. 
मंडपाचे स्तंब हे यज्ञिय वृक्षाचे किंवा बांबूचे हवेत. 
यज्ञमंडप देवता ;-
मधील चार स्तंब ईशान्या पासून ब्रह्मा, विष्णु, शिव, इंद्र
बाहेरील  ईशान्य क्रमष:  सूर्य, गणेश, यम, नागराज,{सर्प} कार्तिकेय, वायु, सोम वरुण, अष्टवसु, कुबेर, बृहस्पती, विश्वकर्मा, यांची स्थापना होते. 
व्दार:- यज्ञमंडप चार व्दारांनी युक्त असतो. पूर्व दक्षिण,पश्चिम उत्तर पश्चिम व्दरांतुन प्रवेशहोतो. 
अडीच हस्तरुंद व तीन हस्त उंच असे व्दारांचे प्रमाण आहे.
पूर्वेस वड दक्षिणेस उंबर पश्चिमेस पिंपळ उत्तरेस प्लक्षाचे लाकूड वापरावे. किंवा उपलब्धते नुसार वापरावे.
पूर्वेस पिवळा,द्क्षिणेस काळा पश्चिमेस पांढरा, उत्तरेस पिवळा रंग किंवा वस्त्र लावले पाहीजे .
यज्ञमंडपाच्या देवता स्थापन पूजन :- 
 
यज्ञमंडपाच्या बाहेर आठरा कलश असतात,त्यात चार कलश चारदिशेनां चार उपदिशेना चार पूर्व ईशान्य मध्य एक नैऋत्य पश्चिममध्य एक हे दहा कलश दिक्पालाचे असतात व्दारावर दोन-दोन कलश असतात. 
पूर्वव्दार :- हे व्दार ऋग्वेदाधिष्ठित {ऋग्वेदप्रधान} , सुढृडनामक तोरण, राहु-बृहस्पति कृतयुग यांनी मंडीत{आधिष्ठित} असते. व्दारकलशावर ध्रुव यांची स्थापना होते.  ऎरावतदिग्ज इंद्र यांची स्थापना पूजन होते व्दार  शाखेच्या दक्षिणोत्तर धात्री,विधात्री व्दारश्रियै, गणपति,वास्तुपुरुष,देहल्यै,गणेश स्कंद, गंग यमुना,यांची स्थापनपूजन बलिप्रदान करावे
अग्नये दिशेस .पुंडरीक,अमृत,अग्नि यांची स्थापना पूजन बलिप्रदान करावे.
दक्षिण व्दार :- यजुर्वेदाधिष्ठ विकटनामक तोरण सूर्य, अंगारकांदिकांनी युक्त असते. कलशावर धारा या देवतेची त्रेतायुग यांची स्थपना होते..वामनदिग्ग्ज यम यांची स्थापना  व्दारशाखेवर बल,सबल,श्रियै गणपति,देहल्य,वास्तुपुरुष,पुष्पदंत ,कपर्दि, यांची स्थापना पूजन बलिप्रदान होते. कलशावर गोदावरीकृष्णेची स्थापना करावी.
नैऋत्य दिशा :- कुमुद दुर्ज्ज्यम निरऋति यांची स्थापना पूजन बलिप्रदान . 
 
पश्चिम व्दार :- सामवेदाधिष्ठ, सुभीम नामकतोरण, शुक्रबुध,व्दापारयुग,यांची स्थापना होते.व्दारकलशावर वाक्पतिची स्थापना होते अंजन नावाचा दिग्ग्ज  व्दारशाखेवर जय विजय  श्रियै गणपति देहल्यै, वास्तुपुरुष, नंदीनी चंद्र, कलशावर रेवा {नर्मदा} यांचे स्थपन पूजन बलिप्रदान होते. 
वायव्य :- पुष्पदंत,सिध्दार्थ, यांचे स्थापन पूजन बलिप्रदान करावे.
उत्तर व्दार :- अर्थववेदाधिष्ठ सुप्रभा तोरण ,कलियुग सोम,केतु,शनैश्वर यांची स्थापना होते. कलशावर विघ्नेश्वराची स्थापना होते.सार्वभौम दिग्ग्ज व्दारशाखेवर चंड -प्रचंड व्दारश्रियै, गणपति, देहल्यै,वास्तुपुरुष महाकाल, भृंगिण,,यांचे स्थापन पूजन बलिप्रदान होते.  कलशावर वारुणी वेण्या यांची स्थापना होते.
ईशान्य:- सुप्रतिक ,मंगल, ईशान यांची स्थापन पूजन बलीप्रदान होते. 
ऊर्ध्व :- ईशान्यपूर्व मध्ये ब्रह्मा 
अधर :- नैऋत्य पश्चिम मध्ये अनंत यांची स्थापना पूजा बलीप्रदान करावा.
महाध्वज:- पंचवर्णात्मक इंद्राच्या मंत्राने स्थापन करावा. 
मंडपाच्या आतिल बाजुस असणारे सांध्ये,वासे, यांवर सर्वदेवतंची स्थापना होते{ सर्वेभ्यो देवेभ्यो नम; } 
वंशावर {वेळु} वर किन्नरेभ्यो नम: म्हणुन किन्नरांचे स्थापन पूजन करावे. 
मंडपाच्या बाहेर पूर्वेस किंचित भूमि सारवुन तेथे  बसावे व ब्रह्मा विष्णु देव दानव गंधर्व,यक्ष,राक्षस पन्नाग,गो ऋषि,मनुष्य, देवमातृ,  इत्यादींचे आवाहनपूजन करुन सर्वांसाठी एक बली प्रादानकरावा. हातपाय स्वच्छधुवुन मंडपात प्रवेश करावा  नंतर मुख्यदेवता व पीठस्थ देवतेंचे आवाहन पूजन करावे. कर्मांतापर्यंत वरील देवतेंचे पूजन होणे अवश्यक आहे,.
मंड्पाच्या संज्ञा { बोधायन उक्त }
आठ हस्त प्रमाण ” जय” नामक दहा हस्त ” विजय” नामक , बारा हस्त ” भद्र” नामक , चौदा हस्त “सुभद्र” नामक , सोळा हस्त “आनार्क”, अठरा हस्त ” विश्वरूप” , वीसहस्त “ध्रुव”  बावीस हस्त” सुभद्रक” चोवीस ह्स्त” सुप्रसन्न” 
पारिजात उक्त हस्तप्रमाण वरीलप्रमाणेच  क्रमश: घन ,घोर,विराम,कांचन,कमराज, सुघोष,धर्धर,धन ,अशा त्या त्य प्रामाणाप्रमाणे मंडप संज्ञा होत.
  
 
यज्ञमंडपाचा परिचयकोणतेही कर्मकरताना आपणास कर्मकरण्यासाठी किंवा बघण्यासाठी तसेच ऊन पाऊस, वारा, यांच्या पासून रक्षण व्हावे. कर्म निवांतपणे किंवा आरामदाई होण्यासाठी मंडपांची निर्मीती {शाळांची} निर्मिती झाली. जी कायमस्वरूपी शाळाझाल्या व तात्पुरते कारणासाठी मंडपाची निर्मीती झाली. जसे गोशाळा, यज्ञशाळा नृत्यशाळा वगैरे , हेच तात्पुरत्या कारणांसठी मंडप तयार झाले . जसे यज्ञमंडप, विवाह मंडप वगैरे . सध्या आपण यज्ञमंडपाचा विचार करु, धन धान्य ऎश्वर्य लैकीक,-पारलौकीक वस्तुंच्या लाभासाठी यज्ञ करावा. त्याच प्रमाणे श्रौत-स्मार्तकर्मामध्ये यज्ञास अत्यंत महत्व आहेच . अग्निहोत्र वैश्वदेवासारखी नित्य उपासना आहेच यज्ञाची फलप्राप्ती ही भूमीवर सुध्दा अवल्ंबून असतेशुभमुहूर्तावर पुरोहीत,यजमान,कारागीरासह भूमीचे संशोधन केले पाहीजे, एक हात खड्डाकरून काढलेली माती चाळून घ्यावी खड्डा पाण्याने भरावा त्यात चाळलेलीमाती ओतावी, पृष्ठभाग काचेप्रमाणे चकचकीत करावा, पाच दिवसाच्या नंतर त्या जागेचे निरिक्षण करावे. तडेगेल्यास अयोग्य समजावी. कारागीरसुध्दा खरेबोलणारा, सद्वर्तनी,विवेकी,कार्यातनिष्णात,मंडपकुंडांची तत्वे जाणणारा, देवधर्मयावरश्रध्दा असलेला असावा. मलीनवस्त्रेधारणकरणारा, रोगी, व्यसनी, अवडंबर करणारा नसावा. भूमीचे विभाग :- तीन ते सात हस्तप्रमाणमंडपाचे विभाग होत नाहीत, आठ ते अठरा  ”       ”    तीन्-तीन विभाग होतात. वीस ते अठ्ठावीस ”       ”    पाच -पाच विभाग होतात. तीस त पंचाहत्तर ”      ”    सात -सात  ”    ” शंभर हस्तम्ंडपाचे दहा -दहा  विभाग होतात. स्तंभांची संख्यातीन ते सात हस्तप्रमाण मंडपाला ४ स्तंभ असतात. आठ ते अठरा  ”         ”   १६  ”   ” तीस ते पंचाहत्तर ”        ”   चौसष्ट स्तंभ असतात . शंभर हस्तप्रमाण मंडपाला एकशेहे एकवीस स्तंभ असतात. ***नामकरण :-तीन ते सात हस्तप्रमाण मंडपास  ” एकभू” अशी संज्ञा आहे. आठ ते अठरा  “”       ”     “व्दीभू”  ”      ”   ” तीस ते पंचाहत्तर “{”     ”      ” चतुर्भू ” ”   ”   ”  शंभर हस्तप्रमाण      “”       दशभू”     ”    ”   ” यज्ञभूमीचे फल अग्नयकोण उतार व्देष मत्सर, रोग निर्माण करतो.दक्षिणेकडील उतार मृत्युकारक ठरतो .नैऋत्येकडील उतार घरचा नाश करतो पश्चिमेकडील उतार धननाश करतो .वायव्येकडील उतार उव्देगकारक ठरतो.ईशान्ये कडील उतार धनलाभ देतो. पूर्वेस उतार कार्यसिध्दी व उत्तरेस उतार वरदायी ठरतो यज्ञमंडपासाठी स्वत्:ची जमीन उत्तम परकीय जमीनीत मालकाची परवानगी हवी. ती नसल्यास कर्म निष्फळ ठरते. नदी किनारी दोष नाही. जमीनीत भस्म निघाल्यास यजमानांचा नाश ,मुंग्या वगैरे निघाल्यास गावाचा नाश, ओलीमाती वाळूनिघाल्यास    राष्ट्राचा नाश , तुप निघाल्यासपुत्र् व केस निघाल्यास स्त्री नाशहोतो . केश निघाल्यास ब्राह्मणांचा नाश विटादिकांचे तुकडे निघाल्यास बंधुबांधवांचा वियोग होतो गवतादि तृण निघाल्यास कार्यनाश . ओली बारीक वाळू निघाल्यास ज्ञान नष्टहोते. दिशेच्या अज्ञानाने मृत्यु कुलधन नाशहोतो. भूमिचा रंग कोणताही असो जमीन घट्टस्निग्घन माऊमातीचीउपजाऊ असल्यास श्रेष्ठ .दिशाज्ञान
सर्व कार्यास दिक्ज्ञान असणे अतिशय महत्वाचे आहे. १६ अंगुळे प्रमाणाची दोरी घेउन एका ठरावीक बिंदूवर स्थिर ठेउन एक वर्तुळ काढावे. मघ्यभागी १२ अंगुळे एकशंकू रोववावा , पहिल्या प्रहरामध्ये त्याची सावली जेथे पडेल ती पश्चिम दिशा होय . तिस-या प्रहरात सावली जेथे पडेल ती पूर्व  कर्क वृश्चिक वृषभ मकर या राशीत सूर्य असता एक युका अंतर उत्तरेस पुढे धरावे. सिंह कन्या तुळ कुंभ मीन मेष राशीचा रवी असल्यास दोनयुका पुढे द्क्षिणेस धरावी . मिथुन व धनु राशीत रवी असल्यास छाया स्थानीच खुण करावी  पूर्व पश्चिम निम्याने दक्षिणोत्तर व उप दिशांचे ज्ञान होते. कुंडाचे प्रमाण   
 
   

अथ स्मार्त कर्म कारिका

अथ स्मार्त कर्मकारिका
[प्रायश्चित्तं]
संकल्प: स्वस्तिवाक विप्रवरणं भूतानिस्मृति: । पंचगव्यै: भूमिशुध्दि: मुख्यदेवता पूजनं ॥
अग्निप्रतिष्ठा सूर्यादिग्रहस्थापनपूजन । देवतान्वाहित पात्रासादनं हविषां कृति: ।।
यथाक्रमं त्यागहोमौ इति पूर्वांग क्रम: ||
पूजास्विष्टं नगाहुत्या बलि: पूर्णाहुतिस्तथा ॥ पूर्णपात्रविमोकादि अग्न्यार्चनांतेऽभिषेचनं ।
मानस्तोकेतिभूतिश्र्च देवपूजाविसर्जने । श्रेयोदान दक्षिणादिदानं कर्मेश्र्वरार्पणं ॥
क्रमोऽयमुत्तरांगानां प्राय: स्मार्तेष्विति स्थिति ॥
आपण जे नेहमी कर्म करतो त्याचा एक क्रम आहे. त्यालाच याज्ञिक भाषेत कारिका असे म्हणतात त्यातुनच कर्म कसे करावे पूर्वतयारी इ.माहिती मिळते साधारणपणे कर्माची कारिका पुढील प्रमाणे. कर्माचे मुख्य दोन भाग पडतात एक पूर्वांग व दुसरा उत्तरांगहोय.
शरीरादी शुध्दिसाठी प्रायश्र्चित्त [द्रव्योत्सर्ग,गोपूजन, जपादी, पंचगव्य होम प्राशनादी कुष्मांडाहोमादी]
देशकालउच्चारण करुन मुख्य संकल्प करुन निर्विघ्नतेसाठी गणपति पूजन करावे कर्म पुष्टिस पुण्याहवाचन ,पंचसूनादोषपरिहारार्थ मातृका पूजन पितृतृप्तर्थं [पित्रादि तृप्तिस] नांदिश्राध्द कर्मनिष्पर्थ [कर्म करण्यास ] आचार्यादि [आचार्य ,ब्रह्मा, उपाचार्य्,ऋत्विज,सदस्पति गाणपत्य उपदृष्टा होतादि ] आचार्यांच्या कडुन संकल्प भूमिशुध्द्यादि कर्म मुख्य् देवता स्थापन पूजन [ आवरण देवता,परिवार देवता अंगपूजा पुष्प पत्र्यादी पूजन ,आवरण पूजन ] अग्निस्थापन कुंड अग्नि संस्कार आदित्यादिनवग्रह देवता स्थापन पूजन अन्वाधान पात्रासादनादि कर्म ग्रह ,मुख्यदेवता हवन इत्यादीं कर्म हे पूर्वांग समजले जाते .
स्विष्टकृतादि प्रायश्र्चित्ता कर्म बलिप्रदान पूर्णाहुति अभिषेक अग्न्यार्चन विभूतिग्रहण श्रेयोदान आचार्यादि पूजन गोदानादि दक्षिणा प्रदान आशिर्वादग्रहण कर्म ईश्वरार्पण हे उत्तरांग


यज्ञ ही एक ही एक अशी संस्था आहे ज्या मध्ये अनेक सदस्य किंवा पदाधीकारी असतात. नित्य अनुष्ठानात याला इतके महत्व आजकाल दिले जात नाही मात्र काही विधी[ श्रौतादि यागात] याला अत्यंतिक महत्व आहे किंवहुना त्या पदाशिवाय याग होतच नाही . आता या सर्व सदस्यांची माहीती करवुन घेऊ . 

मुख्य आचार्य :- यज्ञातील अत्यंत मुख्य पद म्हणजे आचार्यपद होय ही व्यक्ति ब्राह्मणांच्या श्रेष्ठकुलामध्ये जन्मलेला असावा वेद-विद्येत प्रविण (विव्दानांचा) मुकुटमणी सर्वप्रकाराच्या हस्तादि क्रियां प्रविण  ज्योतिषशास्त्र प्रविण  आचार्यांच्यां आज्ञेचे उल्लंघन होता कामानये. क्रोधी, लोभी, कपटी, धूर्त, विधूर, वैरागी, इ, व्यक्ति या पीठावर योग्य नव्हे. आचार्यांचे वर्तन पाहुन लोकांच्या मनामध्ये प्रेम सदभावना उत्पन्न होतील असे असावे.

उपाचार्य ;-  आचार्यांच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत आचार्याव्दारा निर्दिष्ट कार्य उपाचार्य पूर्णकरतो गरजेनुसार यांची संख्या एकापेक्षा अधिक असुशकते. 

ब्रह्मा :- सृष्टि निर्मितीस जेवढा ब्रह्मा महत्वाचा तसाच यज्ञकार्यात ब्रह्माचे यज्ञाचे संचलन व त्यातील कमतरता व सुधारणा याचे भान ठेवावे लागते कर्माची सफलता व असफलता यांची संपूर्ण जबाबदारी ब्रह्म्यावर असते. यांची निवड करताना  विषेश दक्षता घेतली पाहीजे. कर्म कितिही विस्तारीत [मोठ्या प्रमाणात ] असले तरी ब्रह्मा मात्र एकच असावा. यांचे स्थान दक्षिण दिशेस असते. याच ठिकाणी दानव, प्रेत,पिशाच, चोरादि अनिष्टांचे  निरसन होण्यास ब्रह्मा आवश्यक असतो.  ब्रह्मा चारीवेदांचा ्ज्ञाता ,धर्मज्ञ उच्चकुळात जन्म श्रोत्रिय व पवित्र असावा लागतो . आळशी ,विधुर, वाझ असुनये. 

ऋत्विज ;- यज्ञ पुरोहिताचे रूप कार्य संपादन करणा-या व्यक्तिस “ऋत्विज” असे म्हणतात. यांचीही संख्या एकापेक्षा जास्त असते.जितके कुंड तितके ऋत्विज संख्या हवी. 

होता :-  ऋग्वेदाच्या मंत्राचे पठण करणारा ” होता ” 

उद्गाता :- सामवेदांचे गायन करणारा “उद्गाता” 

अध्वर्यु :-  हातानी यज्ञाची क्रिया समजावणा-या व्यक्तिस ” अध्वर्यु” म्हणतात  हा यजुर्वेदाचां ज्ञाता असावा.

उपदेष्टा :- उपदेश देणारा गुरुवत पूज्य व्यक्तिस “उपदेष्टा” असे म्हणतात. नित्य सायंकाळी यज्ञामध्ये करणीय  कर्माचा उपदेश देतो.

गणपती :- बुध्दीचे प्रतिक वाक्पटु पुरोहित असतो. विभिन्न प्रकारची मांडणी मंडल .अलंकार रचना करणे श्रृती वाक्याचे उध्दरण याचे व्दारे होते. पहीली वराहुती यांच्या व्दारे होतो.

सदस्यपति :- यज्ञकार्यातील सभांचा संचालक  अध्यक्ष कोणते कार्य कॊणास द्यावे ,कोणास बहिष्कृत करावे, याचे निर्णय ही व्यक्ति घेते.

सर्वोपद्रष्टा :- यज्ञातील सर्व कार्यातील त्रुटींचा सामुग्रींचे निरिक्षण ,त्यांचे व्यवस्थापन करणे यांची जबाबदारी जास्त असते. 

संहिता पाठी :- प्रत्येक वेदासाठी एक -एक या प्रमाणे चार संहिता पाठी असतात पूर्वादी चार दिशेस यांचे स्थान असते. यास त्या-त्या वेदांच्यामूर्ती असे संबोधले जाते. जसे ऋग्वेदमूर्ती, यजुर्वेदमूर्ती, सामवेदमूर्ती, अथर्ववेदमूर्ती. वेदांचे पठण करणे हे त्यांचे कार्य असते.  

स्तोता :- विभिन्न स्तोत्रांचे पठण करणे , आरती,मंत्रपुष्पादिचां विषय यांच्या आधिपत्याखाली येतो. होता वैदिक कर्माचा ज्ञाता  तर स्तोता स्मार्तकर्मचां ज्ञाता. असतो 

कुंडाचार्य :- कुंडाच्या अधिपतिनां कुंडाचार्य म्हणतात. यांचीही संख्या कुंडविस्तारा प्रमाणे एकापेक्षा जास्त असुशकते. 

यज्ञ प्रवक्ता :- यज्ञाचे संपादन ,यज्ञीय क्रियांचा प्रचार प्रसार मुख्य अतिथी, विषेश अतिथी विव्दान यांचा सत्कार सन्मानादि सर्वक्रियांचे संचालन यांचेव्दारे होते.

जपिया :- यज्ञकर्मानुष्ठानांच्या अंगभूत ग्रह वास्तु, अन्य देवतेचे जपासाठी नियुक्ति केलेल्या ब्राह्मणांना जपिया असे संबोधले जाते.

इतक्या सर्वांच्या सहकार्यांनेच यज्ञक्रिया केलीजाते. म्हणुनच यास संसदेचेच स्वरूप दिले आहे.