नामकरण

नामकरण हा संस्कार आज ” बारसे” या नावाने प्रचलित आहे . याप्रकारामध्ये मौज-मजा समारंभ मेजवाणी इतक्यच बाबतीत महत्वाचा आहे. जिथे मौज मजा खाणे-पिणे  व्यवस्थित असेल तरच समारंभ उत्तम होते अशी आपल्या सर्वांचीच गोडगैरसमज आहे. या सगळ्या प्रकारात आपण मूळ संस्कारकडॆ अत्यंत सुलभरित्या दुर्लक्ष करतो . व  नको ते अवडंबर करुन त्यालाच मह्त्व देतो. स्वत:चे अस्तित्व दर्शविण्यास नाव  अत्यंत महत्वाचे ठरते. कारण नावाचा उच्चार केल्यास आपल्या डोळ्यासमोर ठरावीक प्रतिमा उमटते. मग ती व्यक्ति असो, सजीव किंवा निर्जीव वस्तु असो  म्हणुनच हा संस्कार अत्यंत महत्वाचा ठरतो. हा संस्कार जन्मापासुन बाराव्या किंवा दाहाव्या दिवशी ब्राह्मणांचे तेराव्या दिवशी क्षत्रियांचे सोळाव्या किंवा विसाव्या दिवशी वैश्यांचे बत्तिसाव्या दिवशी शूद्रांचे किंवा जनन औशच संपल्यानंतर कुलाचाराप्रमाणे हा विधी करावा.  
देवालये गजाश्र्वानां वृक्षाणां वापिकूपयो: । सर्वापण्णानां पण्णानां चिन्हानां योषितांनृणाम ॥ काव्यानां च कवीनां च पश्र्वादीनां च सर्वश: । राजप्रासद वस्तुनां नामकर्म विशिष्यते ॥  व्यवहार सिध्दिस अनुकूलता व्हावी म्हणुन देवालये,हत्ति,घोडा वृक्ष वापी कूप विक्रीय पदार्थ चिन्ह, स्त्रीया, पुरुष, काव्य, कवी, पशु, राजवाडे, इ. अर्थाने नावे ठेवावीत . देवतावाचक नाम म्हणजे कुलदेवता किंवा आराध्य देवता वाचक नाम ठेवावीत. या साठी सुध्दा काही विधी सांगितला आहे . नाम कसे असावे कोणत्या अक्षराने सुरुवात करावी. कोणत्या अक्षराने सुरुवात करुनये. या विषयी  नियम आहेतच .जसे मासनाम , नक्षत्र नाम व्यावहारीक नाम,  मासनाम हे ज्या महीन्यात जनन होतो त्या महीन्यात विशिष्ठ नावाचा उल्लेख होतो ज्या नावावरुन जातकाचाजनन महीन्याचे ज्ञान होते. भेद एवढाच कि चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यापासुन सुरुवात होते. ही नावे पुढील प्रमाणे . 
चैत्र -कृष्ण  वैशाख- अनंत , जेष्ठ- अच्युत  , आषाढ- चक्री  श्रावण- वैकुंठ  भाद्रपद- जनार्दन , अश्विन- उपेंद्र ,कार्तिक-यज्ञपुरुष , मार्गशीर्ष- वासुदेव, पौष – हरी,  माघ- योगीश, फाल्गुन- पुंडरीकाक्ष  ही मासनामे होत. 
व्यावहारीक नाम :- वर उल्लेख केलेल्या श्र्लोका प्रमाणे व्यहारीक नाम ठेवावे क वर्गादि पहिल्या पाच वर्गातील मृदुव्यंजने व ह यातील कोणतेही व्यंजन प्रारंभी असावे. य,र,ल,व,श,व ही व्यंजने मध्ये असावी. ऋ व लृ  हे स्वर असु नयेत.  पुरुषांची नावे सम संख्यांक व स्त्रीयांची नावे विषमसंख्यंक असावी.
 
नक्षत्रनामाचा दुसरा प्रकार :- 
अश्विनी आदि २७ नक्षत्रांवरुन ही नावे ठेवली जातात. हा प्रकार रूढीत अत्याल्प आहे. माहीती साठी उल्लेख करावा वाटतो . अश्विनीपासुन अनुक्रमे ही नावे ठेवावी.  
१] आश्र्वयुजु २] आपभरण ३] कृत्तिक ४] रौहिण ५] मार्गशीर्ष ६] आर्द्रक ७] पुर्नवसु ८] तिष्य ९] आश्र्लेष १०] माघ ११] पूर्वफाल्गुन १२] उत्तराफाल्गुन १३] हस्त १४] चैत्र १५] स्वाति १६] विशाख १७] अनुराध १८] ज्यैष्ठ १९] मूलक  २०] पूर्वाषाढ २१] उत्तराषाढ २२] अभिजीत २३] श्रावण २४] श्रविष्ठ २५] शातभिषज २६] पूर्वाप्रोष्ठपाद २७] उत्तराप्रोष्ठपदा २७] रैवत
नक्षत्र चरणावरुन [नक्षत्रपाद] प्रत्येक चरणास एकेक स्वतंत्र असे अक्षरांची योजना केली आहे त्या वरुन नक्षत्रचरण  समजते. यालाच जन्माक्षर किंवा पोथीतले नाव नावरस नाव असे संबोधले जाते. पंचागामध्ये आवहकडा चक्र असे एक कोष्टक असते त्या ठीकाणी ही अक्षरे दिलेली असतात. जसे  अश्विनीसाठी चू,चे,चो,ला  भरणी- ली,लू,ले,लो. कृत्तिका- आ,ई,उ,ए रोहिणी-ओ,वा,वी,वू  मृग- वे,वो,का,को, आर्द्रा- कू,घ,गं,छा  पुनर्वसु के,को,हा,ही  पुष्य- हू,हे,हो,डा  आश्लेषा- डी,डू,डे,डो  मघा- मा,मो,मू,मे  पूर्वा- टा,टो टु,टे  उत्तरा- टे,टो,पा,पी  हस्त- पु,षा,णा,ठा  चित्रा- पे,पो,रा,री  स्वाती- रु,रे,रो,ता  विशाखा- ती,तू,ते,तो  अनुराधा – ना,नी,नू,ने  ज्येष्ठा- नो,या,यी,यू  मूळ- ये,यो,भा,भी  पूर्वाषाढा- भू,धा,फा,ढा  उत्तराषाढा- भे,भो,जा,जी  श्रवण- खी,खू,खे,खो धनिष्ठा- गा,गी,गू,गे  शततारका- सा,सी,सू,से  पूर्वाभाद्रपदा- से,सो,दा,दी  उत्ताराभाद्रपदा- दू,झा,ज्ञा,था रेवती-दे,दो,चा,ची  या नंतर व्यवहारीकनाम जे नेहमी आपण नित्य व्यवहारात वापरतो. आज-काल हे नाव अत्यंत दुर्लक्षपूर्वक ठेवलेजाते. नावाच्या अर्थाचा विचार न करताच नामकरण केलेजाते. आपल्या आवडीचेजरी ते नाम असेल किंवा उभयतांच्या आद्याक्षरावरून ठेवण्याचा प्रघात जो दिसून येतो तेथेसुध्दा अर्थाचा विचारहोताना दिसत नाही. जातकाच्या जीवनातील प्रत्येक  व्यवहार यासंस्कारामुळेच होतात याचा आज विसरपडलेला आहे हेच दिसून येते. 
 नामकर्मनिष्क्रमणान्नप्राशनेशु सविता ॥ म्हणजे नामकरण निष्क्रमण अन्नप्राशन या तिनीही संस्काराची देवता ही सविता आहे . आपल्याला वाटेल एकच देवता वेगवेगळ्या संस्कारासाठी आहेत देवताजरी एक असेल तरी त्यांचे कार्य हे त्यात्या संस्काराप्रमाणे त्यांचे कार्यही वेगळेच आहे. जसे आपण व्यक्ति एकच असून नात्याप्रमाणे आपली कर्तव्य ही बदलतात. [जसे  पिता-पुत्र-पति-बंधु-मित्र-आप्त] इ. कार्य बदलते, तसेच या देवातांचे कार्यही वेगळेच आहे. या संस्कारामध्ये ही देवता सूर्याप्रमाणे तेजप्राप्त व्हावे ,कारण ही देवता ही तेजाचीदेवता असून सूर्यालाप्रकाशीत करणारी शक्ति ती सविता. आपले नाव तेज:पुज असावे तसे कर्म व्हावे .नावरूपाला येण्यासाठी ही देवता कार्य करते. 
पार्थिव नावाचा अग्नि हा यासंस्करास असून तो पंचमहाभूतापैकी पृथ्वीपासून जे उत्पन्न होते ते पार्थिव चारभूते ही स्थिर नाहीत मात्र पृथ्वी ही एकच तत्वस्थिर आहे. आपल्याला नेहमी वाटते कि आपले नाव सुध्दा स्थिर असावे. म्हणुनच आपल्या शास्त्रकारानी यांची योजना केली. देवता व अग्नि यांचा उदात्तविचार या मागे आहे. याचा सूक्ष्म विचार आपण करावा. जी आपण नावे ठेवतो ती इतकी विचित्र त्याचा अर्थ तर सोडा पण उच्चारण सुध्दा अत्यंत विचित्रच होतो. वरील सर्व गोष्टींचा विचार व्हावा. मौजमजा करुन बारसे म्हणुन करतो. ते योग्य आहे काय? याचा विचार प्रत्येकाने करावा. 
या नंतर निष्क्रमण नावाचा संस्कार असून तो शिशूला बाहेर घेऊन जाण्यासाठी आहे. हा संस्कार केल्यानंतरच बालकाला घराबाहेर घेऊन जात असत. आज हाही संस्कार इतिहास जमा होताना दिसतो.