चौवीस अंगुळाचा चौरस बनवून त्याच्या मध्यावरून एका कंपासाव्दारे अनुक्रमे तीन सहा नऊ बारा नंतर चौदाअंगुळे सातयव तीनयुका या प्रमाणाचे पाचवे वर्तुळ काढावे . आतील दोन वर्तुळाना सोडुन दिशा-उपदिशा यानां खुण करावी ,[एकेक] चिन्ह करावीत तसेच या आठ चिन्हांच्या मध्यभागी एकेके चिन्हकरावी एकुण १६ सोळा चिन्हे होतील . मधली चिन्हे सोडून दिशा उपदिशा यानां पद्माकार जोडल्यास पद्म कुंड तयार होते. हे कुंड मंडपाच्या उत्तर दिशेस असते ग्रहांच्या बाबतीत हे कुंड गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. दिशेचा विचार करता हे कुंड धन-धान्य समृध्दि होण्यासाठी याचा उपयोग होतो. उत्तरदिशा हि कुबेराची दिशा असुन संपत्ती धन -धान्य इ. अभिवृध्दि व्हावी म्हणुन याचा उपयोग होतो.