पुंसवन व अनवलोभन

मागील संस्कार हा क्षेत्रासंबधी असलेल्या शुध्दिकरणा साठी असणारे क्षेत्रसंस्कारा विचार पाहीला आता गर्भासाठी असणा-या संस्काराची माहिती घेऊ मागील संस्कारामध्ये गर्भप्रस्थापीत करणे हा मुख्य उद्देश होय. तो प्रस्थापित झाल्यानंतर तो वृध्दिंगत होणे गरजेचे असल्यामुळे त्यावर वृद्धिंगत करणा-या संस्काराची गरज असते. पुंसवन म्हणजे पुस्य+अवन: इति पुंसवन पुमान म्हणजे वीर्यवान बलवान संतती निर्माण व्हावी . म्ह्णुन या संस्काराची योजना आहे. कोणत्याही जीवाचा उद्देश हा धर्मादि चार पुरुषार्थ प्राप्तकरणे . त्यास सहाय्य होण्यासाठीच हा संस्कार करावा. 
यासंस्काराचा काल हा गर्भाचे ज्ञानस्पष्ट झाल्यापासून दुस-या, चवथ्या, साहाव्या, आठव्या महीन्यात किंवा सीमंतोन्नयनाबरोबर करावा. दुस-या चवथ्या महीन्यात करणे इष्ट [फायदेशीर] ठरतो. शुक्लपक्षातिल पंचमी पासुन कृष्ण पंचमीपर्यंत चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, पौर्णीमा, या तिथी सोडून रविवार, मंगळवार, गुरुवार, या दिवशी पुष्य,श्रवण,हस्त,पुनर्वसु,मृग,अभिजीत,मूळ,अनुराधा,अश्विनी या नक्षत्रावर [पुष्या पासून उत्तरोत्तर नक्षत्रांचे महत्व कमी होत जाते पुष्य श्रवण हस्त हे उत्तम ] ही नक्षत्रे पुरुषसंज्ञक असल्यामुळे सूर्याप्रमाणे तेज निर्माण करतात. गर्भ तेजस्वी व्हावा हा मुख्यहेतु या वेळेस जलाची प्रमाणाच्यापेक्षा जास्त निर्माण झाल्यास गर्भास हानी होते, म्हणुन पुरुष संज्ञक नक्षत्रांची योजना केली आहे. या संस्काराला काल मर्यादा असल्यामुळे [ठरावीक वेळीच हा संस्कार महीन्यात करणेचा असल्यामुळे] गुरु-शुक्र इ ग्रहांचे बाल्य,वार्ध्यक्य,अस्तवक्री इ.दोष मानुनये.म्हणजेच गुरु-शुक्रांच्या अस्तोद्यां मध्ये हा संस्कार करता येतो.
ममास्यभार्यायामुत्पनत्स्यमान सर्वगर्भाणां बैजिक गार्भिक दोषपरिहार पुंरुपताज्ञानोदयप्रतिरोध परिहारव्दाराश्री परमेश्र्वर प्रीत्यर्थं पुंसवन संस्काराख्य कर्म करिष्ये सामन्यत: हा संस्कार व सीमंतोन्नयन हा संस्कारएकत्रच केला जातो. 
या संकल्पाचा विचार केला असता बिजामधील व गर्भामधील दोषांचे निरसन व्हावे. म्हणजे या ठीकाणी निर्दोषता व्हावी गर्भ शुध्दव्हावा हीच अपेक्षा आहे. कोणत्याही बैजिक [बीजस्थ किंवा गर्भस्थ] दोषांची निवृत्ति होवुन त्यास ज्ञान प्राप्तिमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिकुलता होऊनये. ज्ञानप्राप्तिचा मार्ग सुलभव्हावा हा मुख्य उद्देश या संस्कारामागे आहे. कारण गर्भामध्येसुध्दा ज्ञानप्राप्तकरुशकतो हे महाभारतातील अभिमन्युने दाखवले आहे. तसेच भागवत, गरुडपुराणादि मध्ये उल्लेखकेल्या प्रमाणे सातव्या महीन्यात जीवास ज्ञानप्राप्तझालेले असते. त्या वेळी हा जीव परमेश्र्वराशी संवाद साधत असतो. 
या संस्काराची देवता ही प्रजापति आहे. प्रजापति म्हणजे ब्रह्माच पण कार्य निराळे प्रजेचे पालन करणारा तीची काळजी घेणारा जो तो पति या संज्ञेस प्राप्तहोतो . ब्रह्मा निर्मिती करतो व प्रजापति त्याची काळजी घेतो, कारण यावेळेस गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते तो होऊनये म्ह्णुनच या संस्काराची योजना आहे. 
पवमान नावाच्या  अग्निची योजना करण्यात आलेली आहे. पवमान हा पावनकरणा पवित्र करणारा असा अग्नि या वरील सर्व गोष्टींची पूर्तता करतो. हे ही एक वायुचेच नाव आहे जो गर्भातील पाणी व गर्भाला फिरण्यासाठीचा मार्ग मोकळा होतो. वायुचे नियंत्रण जर नसेल तर अंतराळवीरांच्या सारखी आपली अवस्था झाली असती आपण जे स्थिर राहतो ते फक्त वायुच्या दबावामुळेच . 
पूर्वदिवशी हविष्यान्नने एकभुक्त राहिलेल्या पत्निला मंगलस्नान करवुन पुण्याहवाचनादि कर्म झाल्यानंतर प्रजापतिस उद्देशुन चरुची आहुति द्यावी आपल्या दक्षिण पश्चिमेस मान केलेले व उत्तरेस लोम असलेले असे बैलाचे चर्मावर पत्निस बसवुन तिचा हातस्वच्छधुवुन त्याचा पसा करावा तो गुडध्याच्या आत असावा , समानरूप वत्स असलेल्या गाईचे [अशक्य असल्यास] दुस-या कोणताही गाईच्या दुधापासुन  तयार केलेलेअ दही पसाभरुन ठेवावे त्यावर लिंगा सारखे पूर्वेस अग्र असलेले यव[सातु] ठेवावा त्याच्या दोन्ही बाजुस दोन अंडा सारखे माष[उडीद] ठेवावे.पत्निस विचारावे “किं पिवसी?” पत्निने सांगावे “पुंसवनं”  असे तीन वेळा करावे. या ठीकाणी जे दही सांगितलेले आहे ते फक्त गाईचेचे असावे व आदमुरेच असावे. [दोन-तीन ]तासात होणारे १२-१२ तासाचे दही वर्ज आहे. असे आदमुरे दही ही वीर्यरक्षक असुन ते गर्भातील गर्भाचे रक्षण करते. गर्भाचे पतन होऊनये म्ह्णुन  याच्या जोडीचा संस्कार म्ह्णजे अनवलोभन करावा. मागील संस्काराप्रमाणेच दूर्वांचे रस सेचन करुन ” प्रजावदाख्य सूक्त व जीवपुत्राख्य सूक्त” यांचे पठण करावे. या संस्कामुळे गर्भ बलवान होतो पनत होतनाही, संपूर्णदिवसानंतरच प्रसूति होते. असा हा दुसरा संस्कार  या नंतर गर्भिणस्त्रीस काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते. त्यास गर्भिणीधर्म असे म्हंटले आहे. 
गर्भिणी स्त्रीने हत्ति,घोडा,इत्यादिकांवर बसुनये पर्वत हवेली चढु नये व्यायाम [ठरावीक सोडुन] भराभरा चालणे,गाडीत बसणे,ही वर्ज करावी,राखाडीमध्ये मुसळ,उखळ,पाटा इ. बसुनये. जलामध्ये बुडीमारुनये, निर्जन गृहामध्ये जाणे ,वृक्षाच्या मुळीवर बसणे, अंगमोडणे, अतिशय तिखट,उष्ण,थंड,अंबट जडान्न वर्जावे. मैथुन शोक रक्तकाढणे, दिवसा झोप, रात्री जागरण ,सर्वकालनिद्रा टाळावी. राख,कोळश्याने जमिनीवर रेखाकरण करणे अमंगळ बोलणे अतिशय बोलणे ,हसणे, केस मोकळे सोडणे, उव्दिग्न असणे, कुक्कुटासन घालणे, इत्यादि वर्जावे. गर्भिणीने नेहमी शुध्दराहणॆ गरजेचे आहे. चांगले वाचन,लिखाण,करावे. सुगंधीपुष्पमाळा धारणकरावी,सुगंधी गंधादि धारण करावे, देव देवतांचे चरित्र संतसाधु सत्पुरुषांचे चरित्र वाचावे. गुरु,माता-पिता सासु-सासरे इ वडील माणसांची सेवा करावी. ह्ळद-कुंकु,काजळ इ. सौभाग्य अलंकार धारण करावेत. चवथा,सहावा,आठवा मासात प्रवास वर्जावा. एकंदरीत गर्भास किंवा स्वत:स हानी होईल असे कर्म करुनये.
गर्भिणीपति धर्म :- जितकी जबाबदारी स्त्रीवर आहे तितकीच तिच्या पतिवरसुध्दा आहे. गर्भिण स्त्रीस वांछित असे पदार्थ द्यावेत जेणे करुन चिरायु पुत्र प्रसवेल वांछा पूर्ण न केल्यास पति दोषी ठरतो. समुद्रस्नान ,वृक्ष छेदन क्षौर प्रेतवाहन परदेश गमन ही वर्ज करावी. मैथुन,तीर्थयात्रा,श्राध्दभोजन,नौकारोहण,युध्द,गृहाचा वास्तु,नखे,कॆश,यांचा छेद प्रेताच्यामागुन गमन  चौल विवाह ही सातव्या महीन्यापासुन वर्जावी. क्षौर पिंडदान प्रेतक्रिया गयाश्राध्द ही क्रिया जिवत्पितृकाने व गर्भिण पतिने वर्जावी.
आपल्या कडे तिस-या मासात किंवा पाचव्या मासात ओटीभरणेचा कार्यक्रम सर्वसामान्य पणे असतो. किंवा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात केला जातो या सर्वांचा मुख्य उद्देश एकच  तो म्ह्णजे गर्भिणीस सुख आनंदाची प्राप्ति होऊन गर्भ हा पुष्टव्हावा. डोहाळे म्हणजे दोन जीवांची इच्छा पुरविणे होय. हे सर्व करत असताना संस्काराचा विचार करुन सुसंस्कृत प्रजा निर्माण करावी.