विषम षटकोन कुंड

 चोवीस अंगुलाचा चौरस बनवून त्यावर अठरा अंगुले व दोन यवांचा एक गोलाकार बनवून त्यावर सहा ठिपके समान अंतरावर करुन त्या रेषा तिरप्या {एकमेकाना} जोडाव्या [साधारण दोन उपदिशा व द्क्षिण उत्तर या दिशेवर जोडल्यास ] विषम षटकोन कुंड तयार होते. हे कुंड मंडपाच्या वायव्यदिशेस स्थित असते ग्रहासंबधी हे कुंड केतुग्रहाचे प्रतिनिधित्व करते,
अभिचारिक कर्माचे उच्चट्न करण्यासाठी याचा उपयोग होतो याच्या शेजारी भैरव [क्षेत्रपाल] पीठ असते.


चोवीस अंगुळाचा चौरसात मध्यभागी १८ अंगुळे ५ यव १ युका  इतक्या प्रमाणाचे वर्तुल काढुन त्यात सारख्या [समान] सोळा खुणा कराव्या दिशा-उपदिशा सोडून मधल्या रेषा जोडल्यास विषम अष्टकोन कुंड तयार होते.