सीमंतोन्नयन

यालाचे आपण बोली भाषेत “अठागुंळ ” असे म्हणतो मात्र हा सर्वसामान्य एक सोहळा म्हणुन आपण करतो  सीमंत+उन्नयन=सीमंतोन्नयन म्ह्णजेच सीमंत या शारिरिक संधी भागाचे उन्नयन करणे कार्यरत करणे  होय मस्तकाच्या ठिकाणी असणा-या टाळुच्या ठिकाणी पाच हडांची संधी असुन त्या ठिकाणीच मानसिक शक्तिचे केंद्र असते. साधारण सहस्त्रधार चक्राचा भाग या ठिकाणी असतो तो उन्नयन करणे म्ह्णजे कार्यरत करणे बोलि भाषेत अक्टिव्हेटकरणे होय. या संधीची वृध्दि होऊन कार्य्रत व्हावी म्ह्णुन हा संस्कार गर्भिणीव्दारे गर्भावर करावा. गर्भिणस्त्रीच्या आचार विचार आहार मानसिकस्थितीचे प्रतिबिंब [त्याचे परिणाम ] हे सूक्ष्मरित्या त्या गर्भावर होत असतात. गर्भवती आपली शारिरीक, मानसिक शक्ति गर्भासदेऊशकते. व त्यास विशेष सामर्थ्यवान बनवुशकते. याच ठिकाणी त्या गर्भाची बौधिक पात्रता ढृढ होते.
गर्भाचे ज्ञान स्पष्टझाल्यानंतर चवथा,पाचवा,सहावा,आठवा,नवव्या किंवा प्रसंगी गर्भविमोचनापर्यंत किंवा कदाचीत गर्भिणी ततपूर्वी प्रसूत झाल्यास बालकासह हा संस्कार करावा.पुंसवनास सांगितलेल्या नक्षत्रावर हा संस्कार करावा. 
“मम अस्यां भार्यायां गर्भाभिवृध्दि परिपंथिपिशित रुधीरप्रियाऽलक्ष्मीभूत राक्षसगणदूरनिरसन सकल सौभाग्य निदानभूत महालक्ष्मी समावेशनव्दारा प्रतिगर्भबीजगर्भ समुद्भव एनोनिबर्हण जनकातिशयव्दारा स्त्रीसंस्काररूपं सीमंतोन्नयनाख्य संस्कार करिष्ये” असा संकल्प  करावा.  पुण्याहवाचनादि कर्म झाल्यानंतर धाता,राका,विष्णु,प्रजापति या देवतांच्यासाठी हवन करावे. पत्निच्यामागे उभे राहुन पतिने अपरिपक्वफलानी युक्त पुरुषवाचक उंब-याच्या जोडफळाच्या दोनघोसांनी व विषम स्त्रीवाचक साळिंदराच्या शुभ्रचिन्हांकित काट्याने व दर्भांकुराने परमेश्र्वराचे स्मरण करत  तीन किंवा चारवेळा  गर्भीण स्त्रीचा भांग काढुन सुंदरवेणी घालावी. ती केश व मस्तक ह्यांच्या संधी म्हणजे भांगापासुन मस्तकापर्यंत विंचरावे. त्या नंतर गोधूमची [ गव्हाची औदुंबरासह] माळ तिच्या गळ्यात घालुन वीणा घेऊन सामवेदाने नलादि राजांची गाण्याने  स्तुती करावी.जसे उंबर [औदुंबर] सदा फलित असते तसे ही संतानवती व्हावी. उंबराच्या फळामध्ये ज्याप्रमाणे जीव सुरक्षित राहतात तसा गर्भ तुझ्या गर्भात सुरक्षित राहो. अशी भावना या मागे आहे. तसेच कोणत्याही दुष्ट शक्तिंचा त्रास होऊन गर्भ विकृत न होता तो व्यवस्थित वृध्दिंगत व्हावा हाच हेतु पुंसवन हा पुरुष संस्कार व सीमंतोन्नयन हा स्त्री संस्कार आपल्या शरीरात स्त्री व पुरुष ही दोन्हीही तत्वे असतात. किंवहुना या दोन्हीही तत्वाशिवाय जीवाची निर्मिती होतच नाही. म्हणुनच या दोन्हींही संस्काराची गरज असते. शिव व शक्ति यांच्या संगमाशिवाय जीव नाहीच. जीवाला शिव शक्ति ची मुलभूत गरज असतेच.  या संस्काराची देवता या धाता राका या गर्भरक्षक देवतांच्या समुहातील देवता आहेत. अग्निसुध्दा मंगल नावाचा आहे .जो सर्वत्र चांगले करतो शुभकरतो तो अग्नि या संस्कारास मंगलदायक करतो. 
गर्भावस्था त्यांचे स्वामी व स्थिती यांचे वर्णन आपल्या शास्त्राने सांगितलेले आहे.
मास स्वामी स्थिती[गर्भाची अवस्था]
प्रथम मंगळ कलक
व्दितीय शुक्र पिंड
तृतीय गुरु लिंगादि अवयव 
चतुर्थ रवि आस्थि नसा संधी
पंचम चंद्र चर्म पृष्ठावरण 
षष्ठ शनि रुधिर रोम नखादि 
सप्तम चंद्र चित्त चैतन्य 
अष्टम लग्नेश भूक तहान स्वाद 
नवम चंद्र प्रसवण्यास आतुर 
दशम रवि  जातक 
वरील स्थिती ही अधुनिक वैज्ञानिक शोधाशी मिळते जुळते आहे.याचा उल्लेख आपल्या भागवत,गुरुचरित्र, गरुड्पुराण ,इ अनेक ग्रंथामध्ये आहे.