चौवीस अंगुलाच्या चौरसाच्या बाहेर पश्चिमेस नैऋत्य-वायव्य दिशेस सहा-सहा{६-६} अंगुळे वाढवून ती पूर्वेकडे तिरपी एकत्र मीळवावी. म्हणजे त्रिकोण कुंड तयार होईल . हे कुंड मंडपाच्या नैऋत्य दिशेस पूर्वाभिमुख असते पश्चिमेस योनि असते. रिपुपीडा परिहारार्थं {शत्रुभय} संकटाचे निवारण होण्यासाठी शत्रूचा पराभव होण्यासाठी या कुंदाचा उपयोग होतो. तसेच रोगांचाही नाश होतो. यजमान सर्वप्रभुत्व प्राप्तकरवुनघेतो. ग्रहांच्या बाबतीत हे कुंड राहू ग्रहाचे प्रतिनिधीत्व करते. मंडापामध्ये या कुंडाच्या शेजारी वास्तुपीठ असते.