एक हस्ताचा चौरस बनवून निम्म्यावर द्क्षिणोत्तर एक लंब काढावा, पश्चिमभागाच्या अर्घ्या भागाचे पूर्व पश्चिम दोन भाग करावे. त्याच्या अर्ध्यावर कोनातून रेष तीरपी काढावी, जी दुस-या कोनात मिळेल दुस-या कोनातूनही अशीच रेष काढावी. या ठिकाणी एकुण चार रेषा तिरप्या असतील मूळ चौरसात पूर्वदिशेस ५ अंगुळ १यव,२ युका वाढवाव्यात चौकोन करुन मध्ये द्क्षिणेकडुन तिरपी रेष द्यावी जी वाढवलेल्या रेषेच्या वरच्या भागात मीळेल . त्असेच उत्तरेकडे करावे, त्यानंतर खाली दक्षिणेकडे व उत्तरेकडे बनवलेल्य दोन भागांचा मध्यापासून वेगवेगळ्या वळ्वुन पश्चिमेच्या मध्यभागी मिळवाव्या . हे कुंड मंडपाच्या आग्नय दिशेष स्थित असते संत्तती संबधी कर्मानुष्ठान करावयाचे असल्यास या कुंडाचा उपयोग करावा. देवीसाठी देवीसंबधीअनुष्ठान या कुंडात करण्याचा प्रघात आहे. हे कुंड ग्रहांच्या बाबतीत चंद्राचे प्रतिनिधित्व करते. या कुंडास योनि नसते. मात्र हेही कुंड उत्तराभिमुखच असते.याच्याच शेजारी योगिनीपीठ असते.