विष्णुबली

हा म्हणावातर संस्कार म्हणावातर एक सुखप्रसुतिसाठी उपायच .प्रतिगर्भास हा करावा, गर्भापासुन आठव्या महिन्यात व्दितीया,सप्तमी,व्दादशी,या तिथीस श्रवण ,रोहिणी,पुष्य, या नक्षत्रावर चंद्रबलाचा विचार करावा.”ममपत्नया गर्भस्यनिर्वाध परिपोषण पूर्वक सुखप्रसुति सिध्द्यर्थं गर्भाधिदेवताविष्णु प्रीति कामोहं विष्णुबलि नामकंकर्मकरिष्ये” असा संकल्प करुन स्थंडिलाच्या द्क्षिणेस कलशावर विष्णुचीप्रतिमा स्थापन करुन त्यांचे पूजन करावे. अग्निची स्थापना करावी [गृह्याग्निवर करावा] त्या नंतर अग्निमुख करुन विष्णुच्या मंत्राने अवदानधर्माने [हवनकरणाच्या विशिष्ट पध्दतीने] चौसष्ट आहुतिने होम करावा नंतर अग्निच्या पूर्वेस किंवा ईशान्येस गोमयाने सारवुन त्यावर रंगोळीने चार-चार अंगुलि प्रमाणाचे एक-एक चौकोनी घरे करावी. ८*८ चे खाने करुन एकुण ६४ खाने करावी व पूर्वीच्याच मंत्राने ६४ बलि द्यावा[बलि म्हणजे चरुच्या मुटक्या ठेवाव्यात] ते नैऋत्यदिशेच्या बाहेरील पदापासुनसुरवात करावी त्याच प्रमाणे आत -आत जावे. मंडलाच्या मध्यभागी आल्यानंतर मध्ये “नमो नारायणाय ” म्हणुन एकबलि द्यावा पूर्वीच्याच मंत्राने अर्घ्यसुध्दा द्यावेत. शेष चरुचा किंचित अन्न घेऊन त्याचे दोन पिंड करुन दंपत्तिने पृथक पृथक भक्षण करावे. व आचमन करुन होमादी कर्म ईश्वरार्पण करावे. सुखप्रसुति साठी असलेल्या अनेक उपायापैकी हा एक संस्कार किंवा एक उपाय आहे.
सुलभ प्रसूतीचा उपाय
ऋग्विधानानुसार गर्भासप्रतिबंधझाला असेल तर त्यावर उपाय म्हणुन “प्रमंदिने०” या मंत्राचा किंवा “विजिर्हीष्व०” या सूक्ताचा जप करुन घ्यावा [करावा] किंवा वरील मंत्र,सूक्ताने जलाचे अभिमंत्रण करवुन ते गर्भिणीस प्राशनास द्यावे.
“हिमवत्युत्तरे पार्श्र्वे सुरथा नाम यक्षिणी । तस्या: स्मरणमात्रेण विशल्या गर्भिणी भवेत”॥ औम् क्षीं औं [स्वाहा] ” या मंत्राने शंभर किंवा हजार इतक्या मंत्राने दूर्वांकुरानी तिळाचे तेल अभिमंत्रित करावे . त्यातुन थोडे गर्भिणीस प्राशन करावे. गर्भस्थानी चांगल्या प्रकारे लाववे[ जिरवावे] .