चोवीस अंगुलाच्या चौरसाच्या मध्यभागी साडेतेरा अंगुलाचा [१३ अंगुले, ४ यव, २ युका, ५लिक्षा ३ बालाग्र] कंपास घेऊन गोलाकार फिरवावा म्हणजे गोलाकार कुंड तयार होते. हे कुंड मंडपाच्या पश्चिम दिशेस असुन ग्रहांच्या बाबतीत शनी ग्रहांचे प्रतिनिधित्व करते. सर्वशांतीकर्मा साठी प्रशस्त सांगितले आहे. वृष्टि [पाऊस ]पाणी व्यवस्थित होण्यासाठी पीक पाणी सुबत्ता व्हावी म्हणुन या कुंडावर अनुष्ठान करावे